मुंबई हादरली ! शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार
मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर यांना तीन गोळ्या लागल्याची माहिती मिळत आहे. घोसाळकर हे ठाकरे गटाचे दहिसरमधील माजी नगरसेवक आहेत.माजी आमदार विनोद घोसाळकर हे ठाकरे कुटुंबासोबत राहिले होते. दहिसरमध्ये आता काही शिवसैनिक हे शिंदे गटात गेले आहे तर काही ठाकरे गटासोबत आहे. अभिषेक घोसाळकर हे कायम चर्चेत राहिले होते. विनोद घोसाळकर यांची सून आणि त्यांचा मुलगा हे नगरसेवक राहिले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते रिक्युअर बोर्डाचे ते सदस्य होते. राजकीय वाद आणि आर्थिक वादातून ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मुरिश भाई कडून गोळीबार झाल्याची माहीती
मुरीस भाई नावाने प्रसिद्ध असलेला हा व्यक्ती स्वतःला समाजसेवक म्हणतो. एक वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्या विरोधात दहिसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता. मॉरिस भाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचं बोललं जातंय.
गोळ्या घालणाऱ्याने स्वतःला देखील संपवलं
अभिषेक घोसाळकर यांच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती असून त्यांच्यावर दहिसरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मॉरिश नावाच्या व्यक्तीने गोळ्या मारल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून संपवलं असल्याचं समोर आलं आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी गोळ्या घालणाऱ्या मॉरिस नावाच्या व्यक्तीच्या कार्यालयाची तोडफोड केली. घडलेल्या प्रकारामुळे दहिसर परिसरातील वातावरण तापलं असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे.