पहिली नकोशी झाल्याने दुसरीसोबत प्रेमाचे चाळे ; पहिलीने विचारल्यावर मारहाण केल्याने पहिलीने केली आत्महत्या

Spread the love

पहिली नकोशी झाल्याने दुसरीसोबत प्रेमाचे चाळे ; पहिलीने विचारल्यावर मारहाण केल्याने पहिलीने केली आत्महत्या

पिंपरी – प्रियकर प्रेयसीला सतत टाळत असल्याने याबाबत विचारणा केली असता प्रियकर तिला सतत तिच्या मित्र-मैत्रिनींसमोरच मारहाण करीत होता. या त्रासाला कंटाळून २५ वर्षीय तरुणीने हॉस्टेलमधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तीन ऑक्टोबर २०२३ रोजी ‘आयआयएमएस कॉलेज’च्या मुलींच्या डेल्टा होस्टेलमध्ये घडली होती. या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात रविवार दि. ४, फेब्रुवारी,२०२४ रोजी फिर्यादी दिली आहे. अश्वनी भारद्वाज (रा. बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी आणि आरोपी हे ‘एमबीए’चे शिक्षण घेत होते. त्यांचे गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही महिन्यांपासून आरोपी प्रेयसिला सोडून दुसऱ्या मुलीसोबत फिरत होता. याबाबत प्रेयसीने विचारणा केली असता तिला तिच्या मैत्रिणींसमोर आरोपी मारहाण करीत होता. तिचा अपमान करीत होता. ‘तू मरून जा. मला काही फरक पडत नाही,’ असे म्हणून प्रियकराने प्रेयसीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते. या प्रकाराला कंटाळून प्रेयसीने हॉस्टेलमधील खोलीत छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत. मृत तरुणीचे आई – वडील शेतकरी आहेत. त्यांना आपल्या मुलीने का आत्महत्या केली हे माहीत नव्हते. काही दिवसांपूर्वी मुलीने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे त्यांना कळाले. त्यामुळे त्यांनी हिंजवडी ठाण्यात येऊन गुन्हा दाखल केला आहे.मृत तरुणीने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीनुसार हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल असे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम शेळके यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon