फिरण्याचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार ; मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
नाशिक – नाशिक येथे एका महिलेला दारू पाजून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर घोटी व नाशिक परिसरात जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पीडित महिला व आरोपी नीलेश अर्जुन दळवी,रा.ध्रुव,नाशिक हे दोघे एकमेकांना ओळखत होते, या ओळखीचा फायदा घेऊन आरोपी निलेश दळवी याने पिडीत महिलेला बाहेर फिरायला नेण्याचा बहाण्याने घोटी येथील हॉटेल विवांत रिसॉर्ट येथे घेऊन गेला. तिथे गेल्यावर पीडित महिलेची इच्छा नसताना बळजबरीने दारू पाजून ‘तुझ्याशी लग्न करायचे आहे’असे सांगू त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पीडित महिलेला ‘तुझे फोटो व व्हिडीओ माझ्याकडे आहेत आणि ते मी व्हायरल करीन’ अशी धमकी देऊन आरोपी दळवी याने पीडीतेला पुन्हा मुंबई नाक्यावरील एका हॉटेलमध्ये नेऊन तिथेही बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
या प्रकाराला कंटाळून पीडित महिलेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात आरोपी निलेश अर्जुन दळवी याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके हे करीत आहेत.