डोंबिवलीत महिलेची छेड काढणाऱ्या तरुणाला भररस्त्यात नागरिकांकडून चोप ; मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
डोंबिवली – आजदेगाव परिसरात राहणारी तरुणी गुरुवारी रात्री कामावरून घरी परतणाऱ्या तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करत तिची छेड काढल्याची घटना घडली. छेड काढणाऱ्या तरुणाला स्थानिक तरुणांनी बेदम चोप दिल्यानंतर त्याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. प्रीतम गायकवाड असे या तरुणाचे नाव असून तो सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
डोंबिवली आजदेपाडा परिसरात राहणारी तरुणी गुरुवारी रात्री कामावरून घरी परतत असताना प्रीतम गायकवाड याने तिचा पाठलाग केला. परिसरात असलेल्या अंधाराचा फायदा घेत या तरुणाने महिलेचा गळा पकडून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तरुणाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी त्या महिलेने जोरदार प्रतिकार करून आरडाओरड सुरू केला. परिसरात राहणाऱ्या तरुणांनी तिचा आरडाओरड ऐकून धाव घेतली. परीसरातील तरुण येत असल्याचे पाहून गायकवाड याने तिथून पळ काढला. मात्र त्याला पाठलाग करून चांगलाच चोप दिला. त्यानंतर प्रीतम गायकवाड यास पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रीतम गायकवाड हा अंधेरी मरोळ येथे राहणारा असून तो गुरुवारी रात्री डोंबिवलीत त्याच्या नातेवाइकांकडे आला होता. रात्री ११ वाजता माऊली बंगला येथून घरी पायी जात असताना प्रीतम गायकवाड हा जवळ आला आणि त्याने तोंडाला पकडून लगट करून मानेवर नखाने ओरखडून स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी गायकवाड यास अटक करून पुढील सुरू केला आहे.