अंबरनाथमधील तोतया महिला आमदारास बेड्या

Spread the love

अंबरनाथमधील तोतया महिला आमदारास बेड्या

अंबरनाथ – इनोव्हा सारख्या आलिशान कारमधून फिरणाऱ्या व कार वर विधानसभा सदस्य म्हणून मिरवणाऱ्या तोतया महिला आमदारास अंबरनाथ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वंदना संजय मिश्रा असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिच्या साथीदारास देखील अटक करण्यात आली असून इनोव्हा कार जप्त करण्यात आली आहे.

अनमोलकुमार सिंह यांना पिस्तुल शस्त्र परवाना हवा असल्याने त्यांच्या संपर्कात वंदना मिश्रा आल्या. आपण आमदार असल्याने तुमचं काम त्वरित करू देईन अशा भूलथापांना बळी पडून अनमोलकुमार सिंह यांनी मिश्रा यांना टप्याटप्याने ५,००,०००/- रु.दिले, मात्र पुढे कोणतीच आशा दिसत नसल्याने व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनमोलकुमार यांनी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी शहानिशा करून वंदना संजय मिश्रा हिच्या विरोधात भादंवि कलम ४२९ व ४१६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मूळची उत्तरप्रदेशची असणारी वंदना मिश्रा ही काही दिवस साकिनाका व सध्या अंबरनाथ येथे राहत होती, साकीनाका पोलीस ठाण्यात देखील तिच्यावर गुन्हे दाखल असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon