कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांनी पदभार सोडला
राजेश शिरसाठ यांची वरिष्ठ पोलिस निरिक्षकपदी नियुक्ती
आनंद गायकवाड
कल्याण – कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांची छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) या ठिकाणी सहाय्यक पोलिस आयुक्त पदी पदोन्नती झाल्याने त्यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्याचा पदभार सोडला असून त्यांचे जागी भिवंडी येथील विशेष शाखेत कार्यरत असलेले राजेश शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोळसेवाडी पोलिस ठाण्याचा पदभार स्विकारल्यानंतर एखाद दुसरा अपवाद वगळता आपल्या कार्यकाळात घडलेल्या दखल पात्र गुन्ह्यांची वेळीच उकल करून आपले कर्तव्य चोख पणे पार पडणारे महेंद्र देशमुख यांची ऐन नवरात्र उत्सवाच्या तोंडावर पदोन्नतीसह छत्रपती संभाजी नगर येथे बदली झाली होती. परंतु नवरात्र उत्सव चालु असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार महेद्र देशमुख यांनी ४ नोव्हेंबर २०२३ पर्यंत कोळसेवाडी पोलिस ठाण्याचा कार्यभार आपल्पाच हाती ठेवला होता.
परंतु पदोन्नतीचा कार्यभार स्विकारण्यासाठी ते शनिवारी कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या कारभारा पासून मुक्त झाले असुन कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक पदाचा कार्यभार राजेश शिरसाठ यांचे कडे सुपूत्र करण्यात आला आहे.
मावळते वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख आणि नवनियुक्ती वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेश शिरसाठ या दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांचे काही सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी एका छोटेखानी कार्यक्रमात अभिष्ट चिंतन करून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.