सोढी अजूनही बेपत्ताच; तारक मेहताच्या सेटवर दिल्ली पोलीसांना मिळाली मोठी माहिती

Spread the love

सोढी अजूनही बेपत्ताच; तारक मेहताच्या सेटवर दिल्ली पोलीसांना मिळाली मोठी माहिती

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता होऊन ३आठवडे झाले आहेत. मात्र या प्रकरणी पोलिसांना अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलीस अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात पोलिसांना अजून कुठलेच धागेदोरे सापडले नाहीत. गुरुचरण यांच्या वडिलांनाही याविषयी कुठलीच कल्पना नाही, काही दिवसांपूर्वी त्यांनी मीडियासमोर आपली व्यथा मांडली होती. आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांचं एक पथक मुंबईत पोहोचलं आहे. या प्रकरणी तारक मेहताच्या सेटवर जाऊन कलाकारांची चौकशी केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडेच दिल्ली पोलीस अधिकारी मुंबईतील फिल्मसिटीमधील तारक मेहता का उल्टा चष्माच्या सेटवर पोहोचले होते. त्यांनी गुरुचरण सिंगविषयी या मालिकेतील इतर कलाकारांची चौकशीही केली. यावेळी पोलिसांनी कोणाला गुरुचरण सिंग कुठे असू शकतो याची कल्पना आहे का याची चौकशी केली. विशेषत: गुरुचरण सिंग यांच्या जवळचे आणि त्याच्या संपर्कात असलेल्या लोकांचीही पोलिसांनी चौकशी केली. याप्रकरणी पोलिसांना मालिकेच्या सेटवरून मोठी माहिती मिळाली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण सिंगचे प्रॉडक्शन हाऊसकडून पैसे थकीत असल्याच्या काही अफवा होत्या. पण, त्यांना खूप आधीच पैसे मिळाल्याचं पोलिसांना आढळलं.

गुरुचरण सिंग प्रकरणाबद्दल बोलायचे झाले तर, हे प्रकरण तेव्हा सुरू झाले जेव्हा त्याचे वडील हरगीत सिंग यांनी पोलिसात अभिनेता बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलीस गुरुचरण सिंगचा शोध घेत होते मात्र त्याचा कोणताही मागमूस लागलेला नाही. आता या अभिनेत्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना आणखी किती वेळ लागणार हे पाहणं महत्वाचं आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरूचरण याच्यावर अनेक कर्जे होती. थकबाकी असल्याने त्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्याचे १० बँक अकाऊंट आहेत. पोलिसांनी त्याचे सर्व बँक अकाऊंट आणि क्रेडिट कार्डमधून झालेल्या आर्थिक व्यवहारांचाही तपास केला. शेवटचं ट्रान्झॅक्शन १४ हजार रुपयांचं होतं. बेपत्ता झाल्याच्या दिवशी त्यानं एका बँक खात्यातून ही रक्कम काढली होती. एवढंच नाही तर अभिनेत्याने २७ वेगवेगळे ई-मेल अकाऊंट वापरल्याचं दिल्ली पोलिसांना आढळलं. तपासाशी संबंधित एका पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कुणीतरी आपली हेरगिरी करत आहे, असा संशय त्याला होता, त्यामुळे त्याने वारंवार त्याचं ई-मेल खातं बदललं, अशी मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली.

गुरुचरण सिंग हे डिप्रेशनचे बळी असून ते आर्थिक तंगीचा सामना करत असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत, पण गुरुचरण सिंग यांचा शोध अद्याप लागलेला नाही. हे प्रकरण सुटण्याऐवजी अजून गुंतत चाललं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon