पुण्यात महिलेची २० लाखांची फसवणूक; ३ वकील, १ पोलीस कर्मचारी यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल

Spread the love

पुण्यात महिलेची २० लाखांची फसवणूक; ३ वकील, १ पोलीस कर्मचारी यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे– राज्यात दररोज ऑनलाईन फसवणूक प्रकरण नेहमीच समोर येत आहेत, मात्र पुण्यातील घटनेत  ३ वकील व १ पोलीस कर्मचारीच सामील असल्याचे दिसून येत आहे. ‘आम्हाला कोट्यवधी रुपये मिळणार आहेत त्यातून तुम्हाला बक्षीसपत्र सिद्ध करून देतो’, असे सांगून मोनिका मंदार खळदकर या महिलेची २० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी ३ वकील आणि पोलीस कर्मचारी यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऍड. तुकाराम कटुले, अनिल मिसाळ, अनंत संकुडे यांच्यासह मनीषा करडे, मंगला राठोड, सुभाष अवघडे आणि १ अनोळखी पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. हा प्रकार जुलै २०१६ ते एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये घडला आहे. या प्रकरणी खळदकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार महिलेचा ‘ब्युटी पार्लर’ (सौंदर्य प्रसाधन) व्यवसाय आहे. आरोपींनी विश्वास संपादन करून वेगवेगळी बनावट कागदपत्रे सिद्ध करून महिलेची आर्थिक फसवणूक केली. गुन्हा नोंद करतांना १ अनोळखी पोलीस कर्मचारी होता, असे तक्रारदार महिलेने सांगितले; मात्र तो पोलीस खरा आहे काय ? याविषयी अद्याप समजू शकले नाही. तक्रारदारांनी एखाद्या व्यक्तीला पोलिसाचा गणवेश घालून तक्रारदारासमोर उभे केले आहे काय ? याचाही तपास चालू आहे असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon