पुण्यात तरुणीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Spread the love

पुण्यात तरुणीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – तरुणीचा वारंवार पाठलाग केला करून त्रास देणाऱ्या व तिच्या घरी जाऊन शिवीगाळ करुन तिला मारहाण करण्याची धमकी देऊन अश्लील वर्तन करत विनयभंग करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून हा प्रकार मागील दोन वर्षापासून ते १३ मे २०२४ दरम्यान हडपसर परिसरात घडला सुरू होता. तरुणाच्या दररोजच्या त्रासाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ओंकार विजय कामठे (वय-२६ रा. काळेपडळ, हडपसर) याच्यावर भा.द. वि. कलम ३५४, ३५४ (ड), ५०९, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित मुलीचा डिसेंबर २०२२ पासून सतत पाठलाग करुन त्रास देत होता. सोमवारी (दि.१३) मे रोजी आरोपीने तरुणीचा पाठलाग करुन तिच्या घरी आला. त्याने मुलीच्या वडिलांना शिवीगाळ करुन मारहाण करण्याची धमकी दिली तसेच मारहाण करुन अश्लिल शिवीगाळ करत पिडीत मुलीसोबत गैरवर्तन करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पिडीत मुलीने दिलेल्या तक्ररीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon