नाशिकमध्ये मोटार चोरीचा गुन्हा २४ तासात उघड; ४ दुचाकी जप्त

Spread the love

नाशिकमध्ये मोटार चोरीचा गुन्हा २४ तासात उघड; ४ दुचाकी जप्त

पोलीस महानगर नेटवर्क

नाशिक – दुचाकी चोरणाऱ्या दोघांना गंगापुर पोलिसांनी अटक करुन दुचाकीचा गुन्हा २४ तासात उघडकीस आणून ४ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई गंगापुर पोलिसांनी शिवाजीनगर परिसरात केली आहे. अरुण बाळकृष्ण काकुळते (वय-३९ रा. शिवशक्ती चौक, नाशिक), पंकज दगडु सावंत (वय-३८ रा. रोहिणीनिवास, शिवाजीनगर, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत दिनेश कौतिक सोनवणे (वय-२४ रा. शिवाजीनगर बसस्टॉप जवळ, नाशिक) यांनी गंगापुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाला माहिती मिळाली की, दोन जण विना नंबरप्लेटची मोटार सायकल घेऊन शिवाजीनगर परिसरात फिरत आहेत. पथकाने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दुचाकी जप्त केली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली करुन आणखी तीन दुचाकी जप्त केल्या.

सदर कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ- १ किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस अंमलदार गिरीश महाले, गणेश रहेरे, मच्छिंद्र वाकचौरे, सोनु खाडे, सुनित जाधव, गोरख साळुंखे, भागवत थविल यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon