धक्कादायक ! नराधम जन्मदात्या पित्यानेच केली रागाच्या भरात दीड वर्षाच्या मुलाची हत्या.

Spread the love

धक्कादायक ! नराधम जन्मदात्या पित्यानेच केली रागाच्या भरात दीड वर्षाच्या मुलाची हत्या.

योगेश पांडे / वर्ताहर

मुंबई – मानखुर्द परिसरात एका दीड वर्षाच्या मुलाची त्याच्याच वडिलांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली. इम्रान अनिस अन्सारी असे आरोपी वडिलांचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मुलगा आजारी असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले .

मिळालेल्या माहितीनुसार सकीना असे मुलाच्या आईचे नाव आहे. ती पती इम्रान आणि दोन मुलांसोबत मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहते. आफान असे मृत मुलाचे नाव आहे. आफान हा दीड वर्षाचा होता. त्याला किडनीचा आजार होता. त्याच्या आजारावर खर्चामुळे सकिना आणि इम्रानमध्ये वाद व्हायचे. इम्रान हा दारुदेखील प्यायचा. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता इम्रान दारु पिऊन घरी आला. त्यावेळी त्याचे आणि सकिनाचे क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले. त्यानंतर तो घरातून निघून गेला. तो पुन्हा साडेसात वाजता घरी आला आणि त्याने सकिनाला जेवण वाढण्यासाठी सांगितले. सकिना जेवण आणण्यासाठी किचनमध्ये गेली. त्यानंतर इम्रानने झोपलेल्या आफानला उचलून जमिनीवर आपटले. याचा आवाज येताच सकिनाने त्याच्या तावडीतून आफानची सुटका केली.

सकिनानी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केला परंतु उपचारादरम्याना आफानचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत इम्रान अन्सारीला अट केली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon