लातूरमध्ये कुंटनखान्यावर पोलिसांची धाड; दोन अल्पवयीन मुलींची सुटका, चालकावर गुन्हा दाखल

Spread the love

लातूरमध्ये कुंटनखान्यावर पोलिसांची धाड; दोन अल्पवयीन मुलींची सुटका, चालकावर गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

लातूर – लातूरच्या उदगीर शहरात व आजूबाजूच्या परिसरात अनेक अवैध व्यवसाय सुरू आहेत. सदर अवैध धंद्याविरोधात स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्याचाच परिणाम म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सोमनाथपूर गावात उच्चभ्रू वस्तीमध्ये चालू असलेल्या कुंटण खान्यावर शनिवारी संध्याकाळी ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून आठ जणांना पकडले आहे. यातील दोन पीडित अल्पवयीन मुलींना लातूरच्या महिला सुधार गृहात पाठवणी करण्यात आली आहे, तर इतर सहा जणांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सोमनाथपूर हद्दीतील मारवाडी कॉलनी येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये कुंटणखाना चालू असल्याची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी लगेच सापळा रचून सदरील वस्तीतील एका घरात सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर धाड टाकली, त्यावेळेस त्यांना चार महिला व चार ग्राहक पुरुष कुंटणखाना चालवत असल्याचे दिसून आल्याने रंगेहात पकडले. पकडण्यात आलेल्या आरोपींची सखोल चौकशी केली असता, या चार महिला पैकी दोन महिलांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांना देहविक्रीसाठी भाग पाडले जात असल्याचे लक्षात आले. त्या पिढीत महिलांचा जबाब घेतल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवी मुंडे यांच्या फिर्यादीवरून कुंटणखाना चालवणाऱ्या कल्लुबाई नरसिंग माने, मुलगी बालिका नरसिंग माने, विठ्ठल मारुती केंद्रे (रा. तळ्याची वाडी तालुका कंधार) विठ्ठल भागवत नरसिंगे (रा. निळकंठ तालुका औसा) व दोन अल्पवयीन बालक अशा आठ जणांवर शनिवारी रात्री आकाराच्या सुमारास देह व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील दोन पिढीत महिलांना रात्री बारा वाजता येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी समोर हजर केले असता, त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना लातूरच्या महिला सुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले. बाकी सहा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. उदगीर शहरात आणि परिसरात अशा पद्धतीचे अवैध कुंटणखाने आणि अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू असल्याची चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon