कल्याणमध्ये तंबाखूजन्य पदार्थ, विमल गुटखा याची वाहतूक करणाऱ्या २ आरोपींना केले जेरबंद ; खडकपाडा पोलिसांची कारवाई

Spread the love

कल्याणमध्ये तंबाखूजन्य पदार्थ, विमल गुटखा याची वाहतूक करणाऱ्या २ आरोपींना केले जेरबंद ; खडकपाडा पोलिसांची कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य पदार्थ विमल पानमसाला, व्ही-१ टोबॅको, जर्दा छोटे विमल गुटखा विक्री प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी दोघांना अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (८ मार्च) दुपारी दुर्गाडी परिसर कल्याण पश्चिम येथे करण्यात आली.
मोहम्मद राजा मोनिस पठाण (२६) व विनोद गंगवाणी मोहम्मद राजा मोनिस पठाण (२६,रा. वापी, गुजरात ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक आरोपींनी आपसांत संगनमत करून जीजे-१५-एएक्स-०३४८ या वाहनाने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य पदार्थ विमल पानमसाला, व्ही-१ टोबॅको, जर्दा छोटे विमल गुटखा असा एकूण ३०,५७,५००/- रु.किंमतीचा माल विक्रीकरिता बेकायदेशीररित्या वाहतूक करीत असताना मिळून आले.
या प्रकरणी सरकारतर्फे खडकपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा रजि.नं. | २१४ २०२४ भा. द.वि. कलम ३२८,२७२,२७३,३४ सह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ कलम २६ (२) (आय), २७ (३) (ई), २६ (२) (आयव्ही), ३० (२)(ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खडकपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon