नागपुर Archives - Police Mahanagar

नागपूर शहरात जिवंत विस्फोटकांचा साठा आढळल्याने खळबळ; १५ जिलेटीन कांड्या, ५८ डिटोनेटर जप्त
नागपूर शहरात जिवंत विस्फोटकांचा साठा आढळल्याने खळबळ; १५ जिलेटीन कांड्या, ५८ डिटोनेटर जप्त

योगेश पांडे / वार्ताहर

नागपूर – नागपूर शहरातील सीए रोड परिसरात मोठ्या प्रमाणात जिवंत विस्फोटक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील दोसर भवन चौकात, मेट्रो स्टेशनच्या अगदी शेजारी आणि अत्यंत संवेदनशील भागात ही घटना उघडकीस आली. मंगळवारी सकाळी एका घराच्या परिसरात संशयास्पद बॅग असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बॅगमध्ये तब्बल १५ जिलेटीन कांड्या, ५८ डिटोनेटर आणि ८ कनेक्टर आढळून आले. ही बॅग गेल्या एक ते दीड महिन्यांपासून त्या ठिकाणी पडून असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.मंगळवारी सकाळी त्या बॅगमधील जिलेटीन कांड्या बाहेर दिसू लागल्यामुळे घरमालकाच्या लक्षात हा प्रकार आला आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) दाखल झाले. त्यांनी तात्काळ परिसर सील करून शोधमोहीम राबवली. तपासादरम्यान सर्व विस्फोटक साहित्य सुरक्षितपणे जप्त करण्यात आले असून ते पुढील तपासासाठी अज्ञात स्थळी हलविण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा साठा आढळला तो परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. घटनास्थळापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर जामा मशिद, ५०० मीटरवर पोद्दारेश्वर राम मंदिर आणि दीड ते दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

दरम्यान, प्राथमिक तपासात नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरातील एसबीएल कंपनीत झालेल्या स्फोटाशी या विस्फोटकांचा संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संबंधित कंपनीतील स्फोटक साहित्य बेवारस अवस्थेत येथे आणून टाकण्यात आले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले की, घटनास्थळावरून आढळलेले सर्व साहित्य सुरक्षित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, हे विस्फोटक येथे कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवले याचा शोध घेतला जात आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

The post नागपूर शहरात जिवंत विस्फोटकांचा साठा आढळल्याने खळबळ; १५ जिलेटीन कांड्या, ५८ डिटोनेटर जप्त appeared first on Police Mahanagar.

नाशिकमधील भोंदू बाबाच्या प्रकरणानंतर नागपुरातही भोंदूबाबाचा कांड; हरवलेल्या पतीचा शोध लावून देण्याचे आमिष दाखवत विवाहितेवर लैंगिक अत्याचार
नाशिकमधील भोंदू बाबाच्या प्रकरणानंतर नागपुरातही भोंदूबाबाचा कांड; हरवलेल्या पतीचा शोध लावून देण्याचे आमिष दाखवत विवाहितेवर लैंगिक अत्याचार

योगेश पांडे / वार्ताहर

नागपूर – नाशिकमधील भोंदू बाबाच्या प्रकरणानंतर आता नागपुरातही अशाच प्रकारची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरवलेल्या पतीचा शोध लावून देण्याचे आमिष दाखवत एका तथाकथित मांत्रिकाने विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी ६५ वर्षीय आरोपी ताहीर रशीद बेग याला अटक केली असून, त्याच्याकडून आणखी किती महिलांची फसवणूक झाली आहे, याचा तपास सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित ३६ वर्षीय महिला नागपुरात घरकाम करून उदरनिर्वाह करते. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी तिचा पती अचानक कोणालाही न सांगता घरातून निघून गेला होता. त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खूपच खचली होती. या परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपी ताहीर बेग याने स्वतःला मांत्रिक असल्याचे भासवून तिचा विश्वास संपादन केला.

एका कार्यक्रमादरम्यान आरोपीची पीडितेशी ओळख झाली. त्याने जादूटोणा आणि विशेष पूजा करून तिचा हरवलेला पती परत आणू शकतो, असा दावा केला. सुरुवातीला पीडितेचा विश्वास बसावा म्हणून विविध पूजा आणि विधी करण्यास सांगण्यात आले. काही दिवसांनी आरोपीने ‘विशेष पूजा’ करण्याच्या बहाण्याने तिला एकांतात बोलावले. यावेळी आरोपीने पीडितेच्या नातेवाईकांना बाहेर पाठवून तिला धमकावले आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर त्यानंतर आरोपीने तिच्या घरी जाऊनही हा प्रकार पुन्हा केल्याचे तपासात समोर आले आहे.

या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपीचा शोध घेत अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव परिसरातून त्याला अटक करण्यात आली. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी सांगितले की, “पीडितेच्या तक्रारीनंतर त्वरीत कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन अशा भोंदू व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. तसेच, अशा प्रकारच्या फसवणूक आणि अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

The post नाशिकमधील भोंदू बाबाच्या प्रकरणानंतर नागपुरातही भोंदूबाबाचा कांड; हरवलेल्या पतीचा शोध लावून देण्याचे आमिष दाखवत विवाहितेवर लैंगिक अत्याचार appeared first on Police Mahanagar.

नागपूरातील अथर्व मनोरे अपहरण-हत्या प्रकरणात तीन जण अटकेत; खंडणीसाठी मित्राचाच कट उघड
नागपूरातील अथर्व मनोरे अपहरण-हत्या प्रकरणात तीन जण अटकेत; खंडणीसाठी मित्राचाच कट उघड

पोलीस महानगर नेटवर्क

नागपूर : शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय अथर्व मनोरे अपहरण व हत्या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अथर्वचा शेजारी व मित्रच असल्याचे उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस आयुक्त रविंद्र शिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयराम गोपाल यादव (वय १९) यानेच खंडणीसाठी अथर्वचे अपहरण करण्याचा कट रचला होता. त्याला केतन उर्फ कुणाल रमेश शाहू (वय २०) आणि आयुष मोहन शाहू (वय २२) यांची साथ होती. आरोपींनी अथर्वच्या कुटुंबाकडून ४० ते ५० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा डाव आखला होता.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुमारे २० दिवसांपासून या अपहरणाचा कट आखला जात होता. कोणालाही संशय येऊ नये म्हणून हनुमान जयंतीच्या शोभायात्रेतील गर्दीचा फायदा घेत गिट्टीखदान परिसरातून अथर्वचे अपहरण करण्यात आले. अपहरणानंतर त्याला एका ठिकाणी डांबून ठेवण्यात आले होते.

दरम्यान, अथर्व बेशुद्ध होत नसल्याने आरोपींनी त्याला मारहाण केली. या मारहाणीमध्येच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह भरतवाडा परिसरात टाकण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. मृतदेहाची विटंबना झाल्याचेही समोर आले असून या घटनेमुळे संतापाची लाट उसळली होती.

गेल्या तीन दिवसांपासून अथर्व बेपत्ता असल्याने कुटुंबीय आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. शनिवारी दुपारी त्याचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात संताप व्यक्त करण्यात आला होता. विविध ठिकाणी आंदोलन आणि मोर्चेही काढण्यात आले.

या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी पहाटे कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेत मित्रानेच विश्वासघात करत खंडणीसाठी अपहरण आणि हत्या केल्याचे उघड झाल्याने नागपूर शहर हादरले आहे.

The post नागपूरातील अथर्व मनोरे अपहरण-हत्या प्रकरणात तीन जण अटकेत; खंडणीसाठी मित्राचाच कट उघड appeared first on Police Mahanagar.

‘तंत्र-मंत्र’ आरोपांनी राजकारण ढवळून निघाले; सपकाळांच्या ट्विटनंतर खळबळ
‘तंत्र-मंत्र’ आरोपांनी राजकारण ढवळून निघाले; सपकाळांच्या ट्विटनंतर खळबळ

पोलीस महानगर नेटवर्क

नागपूर : राज्याच्या राजकारणात ‘भोंदू बाबा’ प्रकरणामुळे नव्याने वादंग निर्माण झाला असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या ट्विटनंतर आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पद घालवण्यासाठी तंत्र-मंत्र आणि अघोरी पूजांचा वापर केल्याचा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला आहे.

सपकाळ यांच्या मते, सत्ताधारी मित्रपक्षांतील काही घटकांनी भोंदू बाबा अशोक खरात यांच्या माध्यमातून अघोरी पूजा करून फडणवीस यांना पदावरून दूर करण्याचा प्रयत्न केला. या घडामोडींनंतरच खरात यांच्याविरोधात कारवाई सुरू झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे सत्ताधारी आघाडीत अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे.

दरम्यान, २०१८ मध्ये फडणवीस सरकारकडून खरात यांच्या इशानेश्वर मंदिरासाठी निधी मंजूर करण्यात आल्याचा मुद्दाही पुढे आला आहे. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री कार्यालयातील काही अधिकाऱ्यांचे खरात यांच्याशी संबंध असल्याचे आरोपही करण्यात आले आहेत.

या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतचे छायाचित्र समोर आल्याचा दावा करण्यात येत असून, मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही खरात यांच्याशी निकट संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सपकाळ यांनी पुढे म्हटले आहे की, खरात यांच्या कारवायांची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना काही महिन्यांपासून होती; मात्र निकटवर्तीयांच्या संबंधांमुळे कारवाई उशिरा करण्यात आली. आता या प्रकरणाचा राजकीय दबावासाठी वापर होत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून होत असून, चौकशी झाल्यास अनेक मंत्री व अधिकारी अडचणीत येऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

The post ‘तंत्र-मंत्र’ आरोपांनी राजकारण ढवळून निघाले; सपकाळांच्या ट्विटनंतर खळबळ appeared first on Police Mahanagar.

नागपूर पोलिसांनी अखेर उतरवला कुख्यात गुन्हेगार सीटू सिंहचा ‘रुबाब; भररस्त्यात धिंड काढत हात जोडलेल्या अवस्थेत ४ किलोमीटर फिरवलं
नागपूर पोलिसांनी अखेर उतरवला कुख्यात गुन्हेगार सीटू सिंहचा ‘रुबाब; भररस्त्यात धिंड काढत हात जोडलेल्या अवस्थेत ४ किलोमीटर फिरवलं

योगेश पांडे / वार्ताहर

नागपूर – नागपूर शहरात दहशतीचं साम्राज्य उभं करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार सीटू सिंहचा ‘रुबाब’ अखेर पोलिसांनी रस्त्यावर उतरवत मोडून काढला. बुधवारी रात्री धडक कारवाई करत त्याची जाहीर धिंड काढली. या कारवाईद्वारे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याचा ठोस संदेश देण्यात आला आहे. सीटू सिंहच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका घेत ही कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे.

सीटू सिंह याच्यावर खून, प्राणघातक हल्ला, खंडणी, बलात्कार, हाणामारी, शस्त्राच्या धाकावर वसुली आणि शिवीगाळ यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचे अनेक दाखले आहेत. वारंवार गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होत असल्याने त्याच्या वर्तणुकीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्याला अनेक वेळा समज देण्यात आली होती, मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट त्याची दहशत दिवसेंदिवस वाढतच होती. त्यामुळे थेट मैदानात उतरत पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवण्यासाठी सार्वजनिकरित्या ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

बुधवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास नागपूरमधील यशोधरा नगर परिसरातील कांजी हाऊस चौकातून सीटू सिंहची धिंड काढण्यात आली. हात दोरीने बांधून आणि हात जोडलेल्या अवस्थेत त्याला सुमारे चार किलोमीटर अंतर पायी फिरवण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिसरातील नागरिकांनी या कारवाईला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि अनेकांनी पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत केले.

या धिंडीमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, सुमारे चार किलोमीटरचा हा प्रवास सीटू सिंहसाठी ‘दहशतीतून अपमानाकडे’ असा ठरला. अशा कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. यापूर्वीही नागपूर शहर पोलीस दलाने कुख्यात गुन्हेगारांविरोधात अशाच प्रकारे कठोर भूमिका घेतली होती. काही गुंडांची सार्वजनिक धिंड काढून त्यांच्या दहशतीला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर सीटू सिंह विरोधातील ही कारवाईही त्याच धर्तीवर करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांकडून शहरात गुन्हेगारीविरोधात आणखी कठोर धोरण राबवले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

The post नागपूर पोलिसांनी अखेर उतरवला कुख्यात गुन्हेगार सीटू सिंहचा ‘रुबाब; भररस्त्यात धिंड काढत हात जोडलेल्या अवस्थेत ४ किलोमीटर फिरवलं appeared first on Police Mahanagar.

नागपूरच्या काटोलमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; १२ कामगारांचा मृत्यू, १५ जण जखमी
नागपूरच्या काटोलमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; १२ कामगारांचा मृत्यू, १५ जण जखमी

योगेश पांडे / वार्ताहर

नागपूर – नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथून एक अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. राऊळगाव येथे असलेल्या SBL कंपनीत रविवारी सकाळी ७ वाजता मोठा स्फोट झालाय. बारुद आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत हा मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या भीषण स्फोटात १२ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचीही माहिती आहे.

दरम्यान, या भीषण स्फोटानंतर परिसरात मोठा आवाज होऊन एकच खळबळ उडाली. तर या भीषण स्फोटात जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.मोठ्या प्रमाणात झालेल्या स्फोटनंतर परिसरात आगही लागली, दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशामक विभगाकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं. दुसरीकडे परिसरात मृतकांच्या नातेवाईकांनी परिसरात मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाला. नागरिकांमध्ये मोठा रोष उसळल्याचेही चित्र बघायला मिळत आहे. SBL कंपनीत रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र या स्फोटाचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, या स्फोटाच्या अपघातावर काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी १५ मृत्यू आणि २० जखमी झाले असल्याचे सांगितले आहे. या ठिकाणी कंपनीकडून सुरक्षितते बद्दल मोठं दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांनी केलाय. प्रशिक्षणा शिवाय आणि कुठलीही आवश्यक ती काळजी न घेता कामगार वापरले जातात, असा त्यांचा आरोप आहे.

The post नागपूरच्या काटोलमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; १२ कामगारांचा मृत्यू, १५ जण जखमी appeared first on Police Mahanagar.

बारावी पेपरफुटीत धक्कादायक ट्विस्ट; रसायन-भौतिकशास्त्रानंतर गणिताचाही पेपर लीक, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब
बारावी पेपरफुटीत धक्कादायक ट्विस्ट; रसायन-भौतिकशास्त्रानंतर गणिताचाही पेपर लीक, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब

योगेश पांडे / वार्ताहर

नागपूर – नागपूरमध्ये बारावी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रानंतर आता गणिताचाही पेपर फुटल्याचे डिजिटल पुरावे समोर आल्याने हे प्रकरण केवळ अपघाती नसून संघटित रॅकेट असल्याचा संशय बळावला आहे.

१६ फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि १८ तारखेला भौतिकशास्त्राचा पेपर फुटल्याचे उघड झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान अटकेतील आरोपींनी आपले मोबाईल फॉरमॅट केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, पोलिसांनी डिलिट केलेला डेटा पुन्हा रिकव्हर केला असता २१ फेब्रुवारीला गणिताचा तिसरा पेपरही प्रसारित झाल्याचे डिजिटल पुरावे समोर आले. विशेष म्हणजे, सेंट उर्सुला शाळेतील एका विद्यार्थिनीच्या मोबाईलवरून १६ फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि १८ फेब्रुवारीला भौतिकशास्त्राचा पेपर प्रसारित झाल्याचे आधीच उघड झाले होते. आता गणिताचा पेपरही त्याच साखळीतून बाहेर गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात शिक्षक निशिकांत मून याला अटक करण्यात आली आहे. तसेच एक्सेलन्ट अकादमीचे मुस्तफा खान आणि जुनेद जावेद यांनाही जेरबंद करण्यात आले आहे. एका विद्यार्थ्याला जामीन मंजूर झाला आहे. मात्र, या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेला पाचवा आरोपी अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी पाच सदस्यांचे विशेष तपास पथक कार्यरत आहे.दरम्यान, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. काही परीक्षा केंद्रांवर विज्ञान शाखेच्या प्रश्नपत्रिका कमी प्रमाणात पोहोचल्याची तक्रार पर्यवेक्षकांनी केली आहे. २५ ऐवजी २४ प्रश्नपत्रिका मिळाल्याचे निदर्शनास आले. फिजिक्स, केमिस्ट्री, गणित आणि बायोलॉजीच्या पेपरसंदर्भात ही बाब घडल्याने संशय अधिक गडद झाला आहे. प्रेसमधून सीलबंद पाकिटे थेट परीक्षा केंद्रांवर पाठवली जात असताना लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका कशा गायब झाल्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यवेक्षकांनी केंद्रप्रमुखांमार्फत बोर्ड अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला असून, बोर्डाने तपास सुरू केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पेपरफुटी प्रकरणात चार जणांना अटक झाली असून काही महाविद्यालयांशी टायअप असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. सीलबंद लिफाफ्यातील प्रश्नपत्रिका कमी पडण्याचा प्रकार आणि डिजिटल माध्यमातून पेपर प्रसारित होण्याच्या घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. रसायन, भौतिकशास्त्र आणि गणित या तिन्ही विषयांचे पेपर फुटल्याने बारावी परीक्षेच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य सूत्रधार सापडल्यानंतर या प्रकरणातील आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे.

The post बारावी पेपरफुटीत धक्कादायक ट्विस्ट; रसायन-भौतिकशास्त्रानंतर गणिताचाही पेपर लीक, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब appeared first on Police Mahanagar.

मेसमधील जेवणावरून वाद: नागपूर एम्समध्ये ‘किडे-अळी’चा आरोप, चौकशी समिती गठीत
मेसमधील जेवणावरून वाद: नागपूर एम्समध्ये ‘किडे-अळी’चा आरोप, चौकशी समिती गठीत

योगेश पांडे / वार्ताहर

नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर येथील पदवीच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या मेसमध्ये मिळालेल्या रात्रीच्या जेवणात किडे व तळलेली अळी सापडल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. २५ फेब्रुवारी रोजी रात्री जेवण करताना काही विद्यार्थ्यांच्या ताटात असे प्रकार आढळल्याचा दावा करण्यात आला असून, त्यासंदर्भातील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, एका ताटात तळलेली अळी, फळांच्या फोडींवर मेलेला किडा, भाजीमध्ये माशीसदृश पदार्थ, तर मशरूमच्या रश्श्यात स्पंजसारखा संशयास्पद घटक आढळला. काही विद्यार्थ्यांनी अर्धे जेवण झाल्यानंतर ही घाण लक्षात आल्याचे सांगितले. त्यामुळे आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, महाविद्यालय प्रशासनाने या आरोपांवर सावध भूमिका घेतली आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. सोशल मीडियावरील फोटोंच्या आधारे आरोप करण्यात आले असले तरी वस्तुस्थिती तपासण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मेसमध्ये संस्थेतील शिक्षक, डीन व वरिष्ठ अधिकारीही जेवण करतात आणि स्वच्छतेबाबत एम्सचे धोरण अत्यंत कडक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दोष सिद्ध झाल्यास मेस चालविणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

काही अधिकारी व विद्यार्थ्यांनी हा प्रकार ‘खोडसाळपणा’ असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कारण प्रकरण व्हायरल होण्यापूर्वी किंवा नंतर कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेली नव्हती. विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनीही प्रशासनाला कळवले आहे की, त्यांच्याकडे विद्यार्थ्यांकडून तक्रार प्राप्त झालेली नाही.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी मेसमधील मर्यादित जागा व जेवण वाढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या गर्दीबाबत तक्रार केली आहे. प्रशासनाने एका काउंटरवर कर्मचारी नसल्यामुळे गर्दी वाढल्याचे मान्य करत कंत्राटदाराला तातडीने सुधारणा करण्याची ताकीद दिली आहे. चौकशी अहवालानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

The post मेसमधील जेवणावरून वाद: नागपूर एम्समध्ये ‘किडे-अळी’चा आरोप, चौकशी समिती गठीत appeared first on Police Mahanagar.

नागपुरात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर; मामीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी भाच्याला अटक
नागपुरात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर; मामीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी भाच्याला अटक

योगेश पांडे / वार्ताहर

नागपूर – नागपुरात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. मामीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी भाच्याला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मामीला घरात एकटी असताना भाच्याने तिच्याशी अश्लील वर्तन केले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर भाच्याला अटक करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने आपल्या ३० वर्षीय भाच्यावर अश्लील वर्तन व छेडछाडीचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी युवकाला अटक केली असून प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद अल्तमश सलीम शेख असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय पीडिता आपल्या कुटुंबासह यशोधरानगर परिसरात राहते. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ती आपल्या बेडरूममध्ये कपाटातून मुलाचे कपडे काढत होती. त्यावेळी तिचा भाचा खोलीतच बेडवर झोपलेला होता. महिला कपडे घेऊन खोलीबाहेर पडत असताना आरोपीने तिच्या मागून येत तिला पकडण्याचा प्रयत्न केला.

महिलेने तात्काळ विरोध करत त्याच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर आरोपी काहीही न बोलता तेथून निघून गेला. घटनेनंतर काही दिवसांनी, २४ फेब्रुवारीच्या सकाळी महिला घरी एकटी असताना आरोपी पुन्हा घरात आला. त्याने बेडरूममध्ये जाऊन महिलेचा मागून हात धरत अश्लील वर्तन केल्याचे सांगितले जात आहे. महिलेने धाडस दाखवत त्याला जोरात ढकलले व स्वतःची सुटका करून घेत बाहेर पडली.दरम्यान, यानंतर पीडितेने यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध छेडछाडीच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सध्या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

The post नागपुरात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर; मामीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी भाच्याला अटक appeared first on Police Mahanagar.

पत्नीसोबत वादाच्या नैराश्यातून नागपुरातील अंबाझरी तलावात उडी घेऊन पोलिस हवालदाराची आत्महत्या
पत्नीसोबत वादाच्या नैराश्यातून

नागपुरातील अंबाझरी तलावात उडी घेऊन पोलिस हवालदाराची आत्महत्या

योगेश पांडे / वार्ताहर

नागपूर – कौटुंबिक कलहातून पोलिस कॉन्स्टेबलने अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. शीलरत्न भीमराव बेलेकर (४५), असे मृताचे नाव आहे. ते प्रतापनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शीलरत्न बेलेकर यांचा दोन महिन्यांपासून पत्नीसोबत वाद सुरू आहे. त्यांचा मुलगा आठवीत तर मुलगी चौथीत शिकते. दोघांचा ताबा शीलरत्न यांच्याकडे आहे. अपत्यांचा ताबा मिळावा यासाठी पत्नी त्यांच्यामागे तगादा लावायची. यावरून शीलरत्न व त्यांच्या पत्नीमध्ये वाद सुरू होता. १९ फेब्रुवारीला ते प्रतापनगर पोलिस ठाण्यात गेले नाही. तेव्हापासून ते गैरहजर होते.

रविवारी दुपारी शीलरत्न हे त्यांचे भाऊ अजय भीमराव बेलेकर (४९) यांच्याकडे आले. काही वेळानंतर ते घरून निघाले. त्यानंतर त्यांचा कुणाशीही संपर्क झाला नाही. अजय यांनी शीलरत्न हे बेपत्ता असल्याची तक्रार प्रतापनगर पोलिसांत दिली. दरम्यान, मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना मंगळवारी सकाळी अंबाझरी तलावात मृतदेह तरंगताना दिसला. अंबाझरी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. शीलरत्न यांच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली.

या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. सततची ड्युटी, वाढता कामाचा ताण, अपुरी विश्रांती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे अनेक पोलीस कर्मचारी मानसिक तणावाला सामोरे जात असल्याचे वारंवार समोर येत आहे. राज्यात सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरू असताना एका कार्यरत पोलीस हवालदाराने आत्महत्या केल्याने दलातील मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशन, तणावमुक्ती उपक्रम आणि मानसिक आरोग्य सहाय्य व्यवस्था अधिक प्रभावी करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

The post पत्नीसोबत वादाच्या नैराश्यातून नागपुरातील अंबाझरी तलावात उडी घेऊन पोलिस हवालदाराची आत्महत्या appeared first on Police Mahanagar.