लव्ह बाईट, ब्लॅकमेल आणि धर्मांतराचा प्रयत्न; नाशिकमध्ये तरुणीवर लॉजमध्ये अत्याचार

लव्ह बाईट, ब्लॅकमेल आणि धर्मांतराचा प्रयत्न; नाशिकमध्ये तरुणीवर लॉजमध्ये अत्याचार

पोलीस महानगर नेटवर्क 

नाशिक : शहरातील भोंदू खरात प्रकरण ताजे असतानाच पंचवटी परिसरात लैंगिक अत्याचार आणि बळजबरी धर्मांतराच्या प्रयत्नाचे आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एका तरुणाने ओळख वाढवत तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, तिचे फोटो काढून ब्लॅकमेल केले आणि लॉजमध्ये नेऊन अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी तंजीर इनामदार याने तरुणीशी जवळीक साधल्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. ‘लव्ह बाईट’ देत तिचे फोटो काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली. जानेवारी २०२६ मध्ये काढलेल्या या छायाचित्रांचा आधार घेत आरोपीने तिला जबरदस्तीने लॉजमध्ये नेले.

लॉजमध्ये नेल्यानंतर आरोपीने तरुणीला दारू व सिगारेट पाजल्याचा आरोप असून, तिचे कपडे काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. अत्याचारानंतर आरोपीने तिच्या गळ्यातील तुळशीमाळ आणि हातावरील धार्मिक धागे काढून विशिष्ट धर्माच्या रिवाजानुसार कृती करण्यास भाग पाडल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी हे परस्पर संमतीने झालेले प्रेमसंबंध असल्याचा दावा न्यायालयात केला आहे.

घटनेच्या पार्श्वभूमीवर काही संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत यामागील हेतू आणि संभाव्य आर्थिक पाठबळाचा तपास करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून लॉजमधील घटनाक्रम, आरोपीचे आर्थिक व्यवहार आणि संबंधित बाबींचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

नाशिकमध्ये अल्पावधीतच अशा प्रकारच्या घटना समोर आल्याने शहरात चिंतेचे वातावरण असून, महिलांच्या सुरक्षेबाबत कठोर उपाययोजनांची मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon