ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून तरुणीला घरी नेत विद्यार्थीनीला धमकावत अनेकदा अत्याचार; बिहारच्या आरोपीला अटक

ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून तरुणीला घरी नेत विद्यार्थीनीला धमकावत अनेकदा अत्याचार; बिहारच्या आरोपीला अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

जालना – नाशिकमधील आयटी कंपनीमध्ये होणारे धर्मांतर प्रकरण आणि अमरावतीमध्ये घडलेली घटना ताजी असतानाच दुसरीकडे जालन्यातही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता अकरावीमध्ये शिकणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आत्महत्या करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीची ओळख लपविण्यासाठी आरोपीने बुरखा घालून तरुणीला घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचं पीडितीने तक्रारीत म्हटला आहे. याप्रकरणी जालन्यातील कदीम जालना पोलिसांनी बिहारच्या साहिल अन्सारी नावाच्या तरुणाला अटक केली असून त्याच्या विरोधात अत्याचार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल केलाय.

दरम्यान, साहिल अन्सारी नावाच्या आरोपीने मुलीची ओळख पटू नये म्हणून रस्त्यावरून येता जाताना तिला बुरखा घालायला लावत असल्याची ही माहिती पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली. दरम्यान या प्रकरणाचा पीपोलीस सगळ्या बाजूने तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon