पुण्यात अल्पवयीन शाळकरी मुलीचा रिक्षाचालकाकडून विनयभंग; हडपसर पोलीसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Spread the love

पुण्यात अल्पवयीन शाळकरी मुलीचा रिक्षाचालकाकडून विनयभंग; हडपसर पोलीसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – पुणे हे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. पण हल्ली पुण्यात चाललंय काय असा प्रश्न उपरस्थित झाल्याशिवाया राहत नाही. आता आज पुण्यातील हडपसर परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण की एका अल्पवयीन मुलीसोबत भयंकर प्रकार घडला आहे. हा प्रकार एका रिक्षाचालकाने केला आहे. मुलगी शाळेतून घरी परतत होती तेव्हा या नराधमाने ११ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य केले. हा प्रकार समोर आला आल्यानंतर, या प्रकरणात पोलिसांनी वेगाने हालचाल करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पण नेमक्या अशा घटना होतात तरी का हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

युनूस गफार खान (५५) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ६ मार्च रोजी पीडित मुलगी शाळा सुटल्यावर घरी जात असताना ही घटना घडली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे मुलगी घाबरली आणि तिने घरी पोहोचताच कुटुंबीयांना सर्व माहिती दिली. त्यानंतर तात्काळ हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार मिळताच पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास, स्थानिक माहिती आणि शोधमोहीम राबवत त्याला अटक केली.

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पोलिसांनी केलेली जलद व कठोर कारवाई. आरोपीला अटक केल्यानंतर आवश्यक पुरावे संकलित करून केवळ २४ तासांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या वेगवान कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत असून, अशा गुन्ह्यांवर कठोर संदेश दिला जात असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, परिसरात या घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांकडून अशा घटनांवर कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon