पुण्यात दिवसाढवळ्या १६ वर्षीय तरूणाची हत्या; विमाननगर पोलीसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

Spread the love

पुण्यात दिवसाढवळ्या १६ वर्षीय तरूणाची हत्या; विमाननगर पोलीसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – पुण्यातील खडक पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलाचा निर्घृणपणे हत्या केल्याची झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी ही घटना घडली होती. त्यामुळे पुण्यातील काशेवाडी परिसरात शनिवारी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी सध्या संशयातांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. तपास सुरू करून आरोपींना कठोर शिक्षा केली जाणार आहे.

या प्रकरणाबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, अबूबकर अमजद खान (१६) हा मुलगा त्रिकोणी गार्डन, काशेवाडी परिसरात शनिवारी होता. गार्डनच्या परिसरात असतानाच काही अज्ञात इसमांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्यावर सपासप वार करत गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अबूबकरला तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. परंतू, रुग्णालयात जाताच डॉक्टरांनी १६ वर्षीय अबूबकरला मृत घोषित केलं.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. प्राथमिक माहितीच्या आधारे हल्लेखोरांपैकी दोघे विमाननगर येथील म्हाडा कॉलनीत राहत असल्याचे समोर आले. त्यानुसार विमाननगर पोलीस ठाण्याच्या पथकाने वेगाने कारवाई करत परिसरात शोधमोहीम राबवली. पोलीस उपनिरीक्षक राठोड, पोलीस नाईक जोगदंडे, पोलीस अंमलदार लालू कऱ्हे, हरिप्रसाद पुंडे, सागर कासार, प्रशांत सुतार तसेच रात्रपाळी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक घागरे आणि संजय पार्क मार्शल यांच्या संयुक्त पथकाने संशयितांना काही तासांतच ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे तुफेलअली अश्रफअली सय्यद (१९) आणि कमरअली सज्जदअली सय्यद (१९) अशी आहेत. चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून, हल्ल्यासाठी वापरलेले धारदार हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईसाठी खडक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या थरारक हत्याकांडामागील नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon