पोलीस उपायुक्त परिमंडळ ७ मध्ये मोठी कारवाई : ५० कुख्यात गुंडांना हद्दपार

Spread the love

पोलीस उपायुक्त परिमंडळ ७ मध्ये मोठी कारवाई : ५० कुख्यात गुंडांना हद्दपार

रवि निषाद / प्रतिनिधी

मुंबई : मुलुंड परिमंडळ ७ अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सक्रिय असलेल्या ५० कुख्यात आरोपींना हद्दपार करण्याची मोठी कारवाई मुंबई पोलिसांनी केली आहे. पोलीस आयुक्त देवेन भारती, अपर पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील आणि उपायुक्त हेमराज सिंह राजपूत यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

परिमंडळ ७ मध्ये मुलुंड, नवघर, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, पार्कसाईट, घाटकोपर आणि पंतनगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंडमधील ९, नवघरमधील ६, कांजूरमार्गमधील ३, भांडुपमधील ८, पार्कसाईटमधील २, विक्रोळीमधील ४, पंतनगरमधील ८ आणि घाटकोपरमधील १० अशा एकूण ५० आरोपींवर कारवाई करण्यात आली.

ही मोहीम संबंधित पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तडीपार पथकांच्या समन्वयातून राबविण्यात आली. विशेषतः पंतनगर परिसरातील दहशत माजवणाऱ्या १० आरोपींवर केलेल्या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार आणि त्यांच्या पथकाच्या कामगिरीचे विशेष कौतुक होत आहे.

३ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिमंडळ ७ मधील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon