एसटी प्रवासात डिजिटल क्रांती; ‘RuPay On-The-Go’ स्मार्ट कार्ड योजनेचा शुभारंभ

Spread the love

एसटी प्रवासात डिजिटल क्रांती; ‘RuPay On-The-Go’ स्मार्ट कार्ड योजनेचा शुभारंभ

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रालयात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘RuPay On-The-Go’ एनसीएमसी सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचे लोकार्पण केले. या उपक्रमामुळे एसटी बस प्रवास अधिक सुलभ, डिजिटल आणि पारदर्शक होण्यास चालना मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या योजनेअंतर्गत प्रवाशांना विविध सवलतींचा लाभ अधिक सोप्या पद्धतीने मिळणार असून, तिकीट व्यवस्थापनातही सुसूत्रता येणार आहे. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसेच इतर सवलतधारक प्रवाशांना आधार क्रमांकाशी संलग्न एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येणार आहे. यामुळे सवलतींची पडताळणी आणि अंमलबजावणी अधिक वेगाने व अचूकपणे होणार आहे.

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.

राज्य परिवहन व्यवस्थेत डिजिटलायझेशनला गती देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, प्रवाशांचा अनुभव अधिक सुलभ आणि विश्वासार्ह करण्यावर शासनाचा भर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon