मिसिंग महिला व ५ वर्षीय मुलगी अवघ्या काही तासांत सापडली; गुन्हे शाखेची तत्पर कारवाई

Spread the love

मिसिंग महिला व ५ वर्षीय मुलगी अवघ्या काही तासांत सापडली; गुन्हे शाखेची तत्पर कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : हरवलेल्या महिलेचा आणि तिच्या पाच वर्षांच्या मुलीचा ठाणे गुन्हे शाखेने अल्पावधीत शोध लावत त्यांना सुखरूप ताब्यात घेतले. गुन्हे शाखा, घटक १ यांच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.

सदर महिला व तिची लहान मुलगी हरवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग तसेच विविध पथकांमधील समन्वयाच्या जोरावर दोघींचा ठावठिकाणा शोधण्यात यश आले.

अल्पावधीतच दोघींना सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकाने जलद निर्णयक्षमता व समन्वय कौशल्य दाखवत महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, ठाणे पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असून अशा घटनांमध्ये तत्परतेने प्रतिसाद देत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon