वागळे पोलीसांची तत्परता; बेवारस मोबाईल शोधून मालकाच्या स्वाधीन

Spread the love

वागळे पोलीसांची तत्परता; बेवारस मोबाईल शोधून मालकाच्या स्वाधीन

ठाणे : वागळे पोलीस ठाणे हद्दीतील हजुरी परिसरात पेट्रोलिंग करत असताना बीट मार्शलना एक मोबाईल बेवारस स्थितीत आढळून आला. संबंधित मोबाईल मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तांत्रिक तपास सुरू केला.

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाईलच्या मालकाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर संबंधित मालकाशी संपर्क साधून मोबाईल सुरक्षितपणे परत देण्यात आला.
हा मोबाईल वागळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते मालकाला सुपूर्द करण्यात आला. पोलिसांच्या या तत्पर आणि प्रामाणिक कार्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon