रमाबाई कॉलनीतील अंडागळे उद्यान चरसी गर्दुल्लो आणि अहिरे गैगचा बनला अड्डा
पोलीस महानगर नेटवर्क

महापालिकेच्या एन विभागांतर्गत येणारे घाटकोपर पूर्वीच्या रमाबाई कॉलनीतील अंडागळे उद्यान अता या वसाहतीतील चरसी गर्दुल्ला आणि अहिरे गैगचा टपोरीयांचा अड्डा बनला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना या उद्यानात उठणे,बसणे,चालणे अवघड झाले आहे. याबाबत येथील अनेक समाजसेवक व प्रसिद्ध व्यक्तींनी लेखी तक्रारी देऊन हलगर्जी पणा केली जात आहे. अता वरील लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. अनेक तक्रार पत्राची प्रत स्थानिक सहायक पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त परिमंडळ ७ यांना ई-मेलद्वारे पाठवून कारवाईची मागणी केली गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर पूर्व रमाबाई कॉलनीतील अंडागळे बाबा उद्यान हे एकमेव उद्यान आहे. जिथे या विभागातील लोक सकाळ संध्याकाळ काही क्षण शांततेत घालवण्यासाठी जातात. या बागेत परिसरातील वयोवृद्ध नागरिक, महिला व सर्वसामान्य नागरिकही मॉर्निंग वॉकसाठी जातात. स्थानिक समाजसेवक लक्ष्मण जाधव उर्फ बाळू जाधव यांनी सांगितले की,या बागेत सायंकाळी अनेकजण बसून दारू पितात. त्यांच्यासोबत या वसाहतीतील अनेक गुंडही या बागेत बसून गांजा ओढतात आणि तेथून जाणाऱ्या महिलांची छेड काढतात. याबाबत स्थानिक पंतनगर पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी देण्यात आल्या आहेत. कुमारी पूजा अंडागळे या अपंग मुलीनेही तक्रार दिली आहे. असे असतानाही पोलीस प्रशासन याबाबत मौन बाळगून आहे. श्री बाळू जाधव यांनी या प्रतिनिधीला सांगितले की, अहिरे गैग आणि त्यांचा काही दबंग लोक सकाळ संध्याकाळ या बागेत दहशत निर्माण करतात. पोलिस प्रशासनाने ही बाग अहिरे गँगपासून मुक्त न केल्यास त्याविरोधात उच्चस्तरीय आंदोलन छेडण्यात येईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी पोलिस प्रशासनाची असेल, असेही बाळू जाधवयांनी सांगितले आहे. अशे ही सांगण्यात येते की अहिरे गैगचा गुंड या उद्याण्यात संध्याकाळी येऊन धिंगाडा करतात महिलाना छेड काढतात. ज्याची तक्रार श्री दामू अंडागले यांनी केली आहे.