शहापुरात धक्कादायक प्रकार: जबाब नोंदवणाऱ्या पोलीस नाईकावर तरुणीचा अनुचित वर्तनाचा आरोप

Spread the love

शहापुरात धक्कादायक प्रकार: जबाब नोंदवणाऱ्या पोलीस नाईकावर तरुणीचा अनुचित वर्तनाचा आरोप

पोलीस महानगर नेटवर्क

शहापूर : शहापूर येथे एका तरुणीने स्वतःला इजा करून घेतल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तिचा जबाब नोंदवण्यासाठी रुग्णालयात पोहोचले.

मात्र, जबाब नोंदवून झाल्यानंतर संबंधित पोलीस नाईकाने तरुणीकडून तिचा मोबाईल क्रमांक घेतल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्याने अनुचित प्रकार केल्याचा गंभीर आरोप तरुणीने केला आहे.

या प्रकरणी पोलीस नाईक चेतन घाटके यांच्याविरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात असून, दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon