पोलीस दलातील अडचणींचा आढावा; पुणे ग्रामीणमध्ये ‘पोलीस वृंद परिषद’

Spread the love

पोलीस दलातील अडचणींचा आढावा; पुणे ग्रामीणमध्ये ‘पोलीस वृंद परिषद’

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते (भा.पो.से.) यांच्या अध्यक्षतेखाली पुणे ग्रामीण घटकातील ‘पोलीस वृंद परिषद’ उत्साहात पार पडली. या परिषदेत पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दाते यांनी दिले.

परिषदेत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनिल फुलारी (भा.पो.से.) यांनी मनोगत व्यक्त करत पोलीस दलातील समन्वय व कार्यक्षमता वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंह गिल (भा.पो.से.) यांनी केले.

यावेळी पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे यांनी आभार प्रदर्शन केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. आकाश पवार यांनी केले.

या परिषदेला अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार (बारामती विभाग), पोलीस उपअधीक्षक श्री. दिलीप शिंदे (गृह, उपमुख्यालय), वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अविनाश शिळीमकर, तसेच पोलीस निरीक्षक श्री. कोळी यांच्यासह पुणे ग्रामीण जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon