भिवंडीत फर्निचर मार्केटला आग; १० ते १२ दुकानं जळून खाक

Spread the love

भिवंडीत फर्निचर मार्केटला आग; १० ते १२ दुकानं जळून खाक

योगेश पांडे / वार्ताहर

भिवंडी – भिवंडी तालुक्यातील कशेळी परिसरातील चामुंडा कॉम्प्लेक्स येथील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.या आगीत फर्निचरची सुमारे १० ते १२ दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून यामध्ये शेजारील भंगार गोदामही आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे.आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मात्र मोठ्या प्रमाणावर फर्निचर व साहित्य जळाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या परिसरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृतपणे फर्निचर चे गोदामे उभारण्यात आले आहेत.त्यामुळे ही आग लागली की लावली गेली असा देखील प्रश्न उपस्थित होतो.

घटनेची माहिती मिळताच ठाणे, भिवंडी आणि कल्याण येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गोदामातील मोठ्या प्रमाणावरील कापड जळून खाक झाले आहे.

आम्हाला दुपारी साधारण १:३० च्या सुमारास कंट्रोल रूमकडून माहिती मिळाली की कोपरगाव येथील एका गोदामाला आग लागली आहे. आम्ही तात्काळ दोन गाड्यांसह घटनास्थळी पोहोचलो. आग मोठ्या प्रमाणावर पसरली होती आणि बाजूलाच इतरही काही गोदामे आणि रहिवासी वस्ती असल्याने धोका वाढला होता. आम्ही पाण्याचा मारा करून आगीचा वेढा कमी केला. सध्या आग पूर्णपणे नियंत्रणात आली असून कुलिंगचे काम सुरू आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.” अशी माहिती अग्निशमन दलाचे जवानांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon