म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अमृत महोत्सवी बोधचिन्हाचे महापौर रितू तावडे यांच्या हस्ते अनावरण

Spread the love

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अमृत महोत्सवी बोधचिन्हाचे महापौर रितू तावडे यांच्या हस्ते अनावरण

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांची मातृसंस्था असलेल्या दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबईच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष बोधचिन्हाचे अनावरण मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. बँकेच्या मुख्य कार्यालयात ११ मार्च रोजी झालेल्या कार्यक्रमात हा सोहळा पार पडला.

यावेळी बोलताना महापौर तावडे यांनी बँकेच्या पारदर्शक कार्यपद्धती, सक्षम व्यवस्थापन आणि दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळे आर्थिक प्रगती साध्य झाल्याचे सांगितले. सभासद व ग्राहकांना दर्जेदार आणि आधुनिक बँकिंग सेवा देत बँकेने आर्थिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले. ठेवी, कर्जवाटप आणि सेवा सुविधांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने बँकेवर ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला महानगरपालिका उपआयुक्त (सामान्य प्रशासन) तथा बँकेचे कार्याध्यक्ष किशोर गांधी, प्रमुख कामगार अधिकारी सुनील जांगळे, संचालक भानुदास भोईर, किरण आव्हाड, महेश ठाकरे, अभिजीत बागुल यांच्यासह बँकेचे संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, बँकेचे २८ फेब्रुवारी २०२६ अखेर ६६,९२५ सभासद असून कोअर बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, यूपीआय, मोबाईल बँकिंगसह विविध डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच बँकेचे स्वतःचे १३ एटीएम जाळेही कार्यरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon