लाच घेताना उपायुक्त अडकला, आणखी १५ बड्या अधिकाऱ्यांची टीप; मोठं रॅकेट अडकणार

लाच घेताना उपायुक्त अडकला, आणखी १५ बड्या अधिकाऱ्यांची टीप; मोठं रॅकेट अडकणार

योगेश पांडे / वार्ताहर 

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना ४२ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.या कारवाईनंतर मनपातील इतर अधिकाऱ्यांवरही संशयाची सुई फिरली आहे. जवळपास १५ वरिष्ठ अधिकारी आता चौकशीच्या रडारवर आले आहेत.

एसीबीकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर अतिक्रमण विभागातील उपायुक्त,सहाय्यक आयुक्त, अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता अशा १५ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी वाशी येथील एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांना लेखी पत्र देण्यात आले आहे.

दरम्यान,नवी मुंबईतील गावठाण भागात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याचे समोर आले आहे. या बांधकामांना मनपातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा सपोर्ट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.त्यामुळे या प्रकरणाची चौकशी अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे.

अटक करण्यात आलेल्या कैलास गायकवाड यांना न्यायालयाने शनिवार पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे मनपातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon