कल्याण रेल्वे स्थानक परिसरात महिला पोलिसांची विशेष मोहीम; वाहतूक व अतिक्रमणाविरोधात १०३ कारवाया

Spread the love

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात महिला पोलिसांची विशेष मोहीम; वाहतूक व अतिक्रमणाविरोधात १०३ कारवाया

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक व परिसरात महिला पोलिसांकडून विशेष संयुक्त मोहीम राबवून वाहतूक नियमभंग आणि अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण १०३ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही मोहीम महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीत राबविण्यात आली. अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त (झोन-३, कल्याण पश्चिम) यांच्या आदेशानुसार तसेच घेटे, सहाय्यक पोलीस आयुक्त (कल्याण) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे या संपूर्ण मोहिमेत केवळ महिला अधिकारी व महिला पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.

कारवाईदरम्यान वाहन तपासणीसाठी नाकाबंदी करण्यात आली असून नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच रेल्वे स्थानक परिसरात पायी गस्त घालून स्कायवॉकवरही तपासणी करण्यात आली. यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) अतिक्रमण विभागाच्या मदतीने स्टेशन परिसरातील अतिक्रमणेही हटविण्यात आली.

या मोहिमेत विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये कोपता अंतर्गत ३५, कलम ११२ व ११७ अंतर्गत १७, कलम १०२ व ११७ अंतर्गत २८ तसेच वाहतूक शाखेच्या मदतीने नाकाबंदी दरम्यान २३ अशा एकूण १०३ कारवाया करण्यात आल्या.
या विशेष मोहिमेत ४ महिला अधिकारी व ३२ महिला पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. रेल्वे स्थानक परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच वाहतूक शिस्त प्रस्थापित करण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon