पोलीस स्टेशनशेजारीच नशोखोरांचा अड्डा; भाजप नगरसेवकाने मध्यरात्री टाकल्या धाडी, नशेखोरांना दिला चोप

Spread the love

पोलीस स्टेशनशेजारीच नशोखोरांचा अड्डा; भाजप नगरसेवकाने मध्यरात्री टाकल्या धाडी, नशेखोरांना दिला चोप

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईच्या बोरिवली पश्चिम एम.एच.बी पोलीस स्टेशनच्या शेजारी ओल्ड एम एच बी कॉलनी परिसरात नशाचा अड्डा झाल्याचे समोर आले आहे. भाजप नगरसेवक शिवा शेट्टी यांच्या कडून मध्यरात्री नशेच्या अड्ड्याचा ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. धाडीमध्ये नशा करणाऱ्या २ मुलांना रंगेहात पकडून नगरसेवकाकडून चोप देण्यात आला आहे. नगरसेवकाच्या या धाडीमध्ये मुलं गांजा पीत असल्याचं समोर आला, मुलाकडून गांजा सुद्धा जप्त करण्यात आले.

नगरसेवक शिवा शेट्टी यांच्याकडून भाजप आमदार संजय उपाध्याय यांना व्हिडिओ कॉल द्वारे याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. मुंबई परिसर नशा मुक्त करण्यासाठी पोलिसांवर जबाबदारी असते, मात्र पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यामुळं भाजप आमदार संजय उपाध्याय आणि भाजप नगरसेवक शिवा शेट्टी यांच्याकडून बोरिवली परिसर नशा मुक्त करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. शिवा शेट्टी यांच्याकडून दररोज रात्री बोरिवली एम एच बी कॉलनी परिसरात पाहणी केली जात आहे. भाजप आमदार संजय उपाध्याय आणि नगरसेवक शिव शेट्टी यांच्याकडून बोरिवली पॅटर्न राबवून बोरिवली विधानसभा नशा मुक्त, गैरप्रकार व समाजविघातक कृत्ये थांबवण्यासाठी त्यासोबत नशेच्या आहारी न जाता योग्य मार्गाने जीवन घडवावे, हाच या कारवाईचा खरा उद्देश ठेवून कारवाई केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon