फुटबॉलपटूंच्या आडून दहशतवादी कारवाया करण्याचा मोठा कट एटीएस ने उधळून लावला
योगेश पांडे / वार्ताहर
अहिल्यानगर – फुटबॉलपटूंच्या आडून दहशतवादी कारवाया करण्याचा मोठा कट एटीएस ने उधळून लावला आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या सर्तकतेमुळे दहशतवादी नेटवर्क उभं राहण्या आधीच मोठा पर्दाफाश झाला आहे. यवतमाळ, पुसद आणि उमरखेडमधील फुटबॉलपटू दहशतवादी संघटनांच्या रडारवर होते. यवतमाळमध्ये एटीएसने सर्च ऑपरेशन केलं. स्पोर्ट्समध्ये रुची असणार्या अनेकांना दहशतवादी कारवाईत सक्रीय करण्यासाठी प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. एटीएसच मागील काही महिन्यांपासून सर्व हालचालींवर लक्ष आहे. एटीएसने २१ ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलेलं होतं.
चार दिवसापूर्वी एटीएसने यवतमाळ, पुसद, उमरखेड, अहिल्यानर येथे कारवाई केली आहे. २१ ठिकाणी सर्च ऑपरेशन झाल्याची माहिती आहे. यवतमाळ, पुसद, उमरखेड या भागात मोठ्या प्रमाणात फुटबॉल क्लब आहेत. फुटबॉलपटूंना देशाबाहेर पाठवून प्रशिक्षण देणं असेल, वेगवेगळ्या खेळाडूंना देशाबाहेर पाठवून त्यांचं ब्रेनवॉश करुन त्यांना दहशतवादी कारवायांसाठी कसं वापरायचं हा काही संघटनांचा प्लान होता.
एटीएसचं या सर्वावर आधीपासूनच लक्ष होतं. एकाचवेळी तीन शहरात २१ ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं.यवतमाळ, पुसद, उमरखेडमध्ये फुटबॉल क्लबची संख्या जास्त आहे. अहिल्यानगरमध्ये जे सर्च ऑपरेशन केलं, त्याचे पुरावे सापडलेत. काही संशयास्पद तलवारी जप्त केल्या आहेत. एटीएसने दहशतवादी संघटनांचा एक मोठा कट उधळला आहे.
यवतमाळमध्ये पुसद आणि उमरखेडमध्ये १४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. अहिल्यानगरमध्ये सात ठिकाणी एटीएसने छापे टाकले होते.अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये एटीएसने छापेमारी केली होती. मध्यरात्री एटीएसने ही छापेमारी केली. गोपनीय पद्धतीने मुकुंदनगरमधील नागरिकांची चौकशी करण्यात आली. मुकुंदनगर हा मुस्लिमबहुल भाग म्हणून ओळखला जातो. गेल्या दोन ते तीन वर्षात औरंगजेबाचं उद्दातीकरणाचा प्रयत्न असो वा पाकिस्तानच्या घोषणा असो अहिल्यानगर हे चर्चेत आलं आहे.