भिवंडीत भाजपमध्ये फूट! ९ नगरसेवक थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; सदस्यांवर निलंबन किंवा हकालपट्टीची कार्यवाईची शक्यता

Spread the love

भिवंडीत भाजपमध्ये फूट! ९ नगरसेवक थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; सदस्यांवर निलंबन किंवा हकालपट्टीची कार्यवाईची शक्यता

योगेश पांडे / वार्ताहर

भिवंडी – भिवंडी महापालिका महापौर व उपमहापौर पदाची निवड आज होणार आहे . महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे ३०,भाजपा २२, राष्ट्रवादी १२ शिवसेना १२ समाजवादी ६ कोणार्क विकास आघाडी ४ भिवंडी विकास आघाडी ३ अपक्ष १ असे संख्याबळ आहे. महापौर निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना आणि काँग्रेस प्रयत्न करत होते. परंतु महायुतीमध्ये मोठी फूट पडली. शिवसेनेने कोणार्क विकास आघाडी भिवंडी विकास आघाडी व समाजवादी यांना एकत्रित करत २६ चा आकडा जमा केला. परंतु विलास पाटील आणि भाजपमध्ये झालेल्या वादांगा नंतर शिवसेना विलास पाटील यांना जवळ करत आहे. त्यामुळे भाजपा मदत करण्यास तयार नव्हती.

आता भाजपामध्ये देखील दोन गट पडले आहेत. नारायण चौधरी आणि सुमित पाटील यांनी भाजपामधून उमेदवारी मागितली होती. परंतु पक्षाने नारायण चौधरी यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे सुमित पाटील यांचा गट नाराज होता. परंतु त्यांची नाराजी पक्षाने दूर केली आणिनारायण चौधरी व स्नेहा पाटील यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु ऐनवेळेस भाजपने महापौर उमेदवार नारायण चौधरी यांना बदली करून स्नेहा पाटील यांच्या नावाची घोषणा भिवंडी शहर अध्यक्ष रवी सावंत यांनी एका पत्राद्वारे केली. यानंतर भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला होता.

या निर्णयानंतर भाजपचे उमेदवार नारायण चौधरी नाराज झाले व त्यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी स्थापन केलेल्या भिवंडी सेक्युलर फ्रंटमध्ये जाण्याचे निर्णय घेतला. तसेच भाजपचा नऊ नगरसेवकांचा गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीलादेखील गेला होता. काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपाचे उमेदवार नारायण चौधरी व त्यांचे सहकारी मिळून महापौर पदासाठी बहुमताचा आकडा गाठता येतो. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून आज व्हिप जारी केला आहे. ज्यामध्ये नारायण चौधरी यांना महापौर तर काँग्रेसचे तारीक मोमीन यांना उपमहापौर साठी मतदान करण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, भाजपच्या व्हिपच्या विरोधात जर मतदान झाले तर भाजपाकडून विरोधात मतदान करणार्‍यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत एखाद्या पक्षाने गट किंवा आघाडी स्थापन केली असली तरी तो गट फुटू शकतो. मात्र, अशावेळी पक्षाच्या व्हीप किंवा पक्षादेशाच्या विरोधात मतदान केल्यास संबंधित नगरसेवक अपात्र ठरू शकतो आणि त्याची सदस्यता तसेच मिळालेले पदही जाऊ शकते. याबाबत तक्रार आल्यास विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत कार्यवाही होऊ शकते. याशिवाय संबंधित पक्ष आपल्या सदस्यांवर निलंबन किंवा हकालपट्टीसारखी पक्षांतर्गत कारवाईही करू शकतो.

भिवंडीतील भाजपातून बाहेर पडून काँग्रेससोबत येणारे नगरसेवक थोड्याच वेळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिळक भवन येथे भेट घेणार आहेत. ताज्या माहितीनुसार, भिवंडीतील भाजपच्या नगरसेवकांनी काँग्रेसच्या गटामध्ये नोंदणी केली आहे. पण ते काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत का, की केवळ पाठिंबा देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon