१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम तुरुंगातच; सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका फेटाळली

Spread the love

१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम तुरुंगातच; सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका फेटाळली

योगेश पांडे /वार्ताहर

नवी मुंबई : १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी आणि कुख्यात गँगस्टर अबू सालेम याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. २५ वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्याचा दावा करत सालेमने दाखल केलेली सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालय यांनी फेटाळून लावली. त्यामुळे सालेमचा मुक्काम तूर्तास तरी तुरुंगातच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत, शिक्षेत मिळणाऱ्या सवलतींच्या आधारे २५ वर्षांची गणना करता येईल का, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. प्रत्यर्पण करारातील अटी आणि प्रत्यक्ष भोगलेली शिक्षा यामध्ये तफावत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने न्यायालयाने कोणतीही तातडीची दिलासा देण्यास नकार दिला.

पुर्तगालमधून २००५ मध्ये भारतात प्रत्यर्पित करण्यात आलेल्या सालेमला मृत्युदंड दिला जाणार नाही आणि शिक्षा २५ वर्षांपेक्षा जास्त नसेल, असे आश्वासन भारताने दिले होते. मात्र, शिक्षा पूर्ण झाल्याचा दावा न्यायालयाने अमान्य केल्याने सालेमची सुटका लांबणीवर पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon