पोलीस ठाण्याच्या दारातच आरोपीला चोप; शिरापूर अपहरणप्रकरणी ग्रामस्थांचा संताप

Spread the love

पोलीस ठाण्याच्या दारातच आरोपीला चोप; शिरापूर अपहरणप्रकरणी ग्रामस्थांचा संताप

पोलीस महानगर नेटवर्क

पाथर्डी : शिरापूर येथील अपहरण प्रकरणातील अटकेत असलेला आरोपी बाळासाहेब विक्रम घुगे याला न्यायालयातून पाथर्डी पोलीस ठाण्यात आणण्यात येत असताना, पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच संतप्त ग्रामस्थांनी त्याच्यावर हल्ला केला. “हाच तो आरोपी” अशी आरोळी देत काही जणांनी धाव घेत त्याला मारहाण केली.

ही घटना घडताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आरोपीला सुरक्षिततेच्या दृष्टीने ठाण्याच्या आत नेण्यात आले. घटनेनंतर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी जमली होती.

अपहरणाच्या घटनेमुळे शिरापूर गावात तीव्र संताप असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon