बारावी आणि दहावी बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतूक पोलीसांनी केले रायडर्स’ तैनात

Spread the love

बारावी आणि दहावी बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतूक पोलीसांनी केले रायडर्स’ तैनात

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – बारावी आणि दहावी बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतूक पोलीसांनी विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रांवर पोहोचवण्यासाठी विशेष उपक्रम राबवला आहे. या योजनेअंतर्गत ५४ पोलीस ‘रायडर्स’ तैनात केले असून, विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तीन हेल्पलाइन क्रमांक – ७०३९००३८६६, ८२८६३००३०० आणि ८२८६४००४०० जाहीर करण्यात आले आहेत.

उपक्रम सुरू झाल्यापासून फक्त दोन दिवसांतच परीक्षेला उशीर झालेल्या २६ विद्यार्थ्यांना पोलीस रायडर्सने मदत करून वेळेत परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवले. यात सिग्नल क्लिअर करणे, पर्यायी मार्ग दाखवणे आणि आवश्यक ठिकाणी वाहन एस्कॉर्ट देणे यासारख्या उपायांचा समावेश आहे.

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा परीक्षा संबंधी ताण कमी झाला आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon