लिफ्टमध्ये बारा वर्षीय मुलीचा विनयभंग; मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

लिफ्टमध्ये बारा वर्षीय मुलीचा विनयभंग; मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

भाईंदर: मिरारोड येथील एका रहिवासी इमारतीतील लिफ्टमध्ये बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी एकटी असल्याची संधी साधून एका तरुणाने तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

पीडित मुलगी मामाच्या घरी जेवण पोहोचवण्यासाठी जात असताना इमारतीतील लिफ्टमध्ये चढली होती. त्या वेळी लिफ्टमध्ये तिच्याव्यतिरिक्त एक तरुण उपस्थित होता. लिफ्टमध्ये इतर कोणी नसल्याचे लक्षात येताच आरोपीने बटण दाबण्याच्या बहाण्याने मुलीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे मुलगी घाबरून गेली. मामाच्या घरी पोहोचल्यानंतर तिने घडलेली घटना मामीला सांगितली.

यानंतर पीडित मुलगी व तिच्या मामीने अमित सिंह (२६) याच्याविरोधात मिरारोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, सार्वजनिक तसेच रहिवासी इमारतींमध्येही अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon