नवी मुंबई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन

Spread the love

नवी मुंबई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशा विविध पदांवर अनेक वर्षे कर्तव्य बजावलेले आणि सध्या नवी मुंबई गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले गिरीधर गोरे यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने नवी मुंबई पोलीस दलाने एक अनुभवी, कर्तव्यनिष्ठ व कडक शिस्तीचा अधिकारी गमावला आहे.

गिरीधर गोरे यांनी आपल्या सेवाकाळात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे तसेच अनेक संवेदनशील प्रकरणांचा यशस्वी तपास करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. प्रामाणिकपणा, शांत स्वभाव आणि उत्कृष्ट तपास कौशल्य यासाठी ते सहकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आदराने ओळखले जात होते.

त्यांच्या निधनाची बातमी समजताच पोलीस दलासह सर्व स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, आप्तेष्ट आणि मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon