“मैं टिचर हूं, कुछ भी कर सकता हूं” म्हणत ट्यूशन हॉलमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग; आरोपी टिचरला अटक

Spread the love

“मैं टिचर हूं, कुछ भी कर सकता हूं” म्हणत ट्यूशन हॉलमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग; आरोपी टिचरला अटक

योगेश पांडे / वार्ताहर

लातूर – लातूर शहरातून शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. “मैं टिचर हूं, कुछ भी कर सकता हूं” अशी मग्रूर भाषा वापरत लातूरच्या ट्यूशन एरियातील एका खासगी ट्यूशन हॉलमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाने ट्यूशनसाठी येणाऱ्या एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.

संबंधित विद्यार्थिनी ट्यूशनसाठी नेहमीप्रमाणे हॉलमध्ये आली असताना शिक्षकाने एकांताचा गैरफायदा घेत तिच्याशी गैरवर्तन केले. या प्रकारामुळे विद्यार्थिनी प्रचंड घाबरून गेली. घरी आल्यानंतर तिने हा सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाणे येथे आरोपी शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून आरोपीकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon