पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफास; ५ महिलांची सुटका करत ३८ हजारांचा माल जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पुणे शहर पोलिसांनी शनिवारी विमान नगर परिसरात ही कारवाई केली. येथे स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवलं जात होतं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांनी ‘सिग्नेचर थाई स्पा’वर छापा टाकून, यावेळी ५ महिलांची सुटका करण्यात आल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी स्पा ऑपरेटरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी यावेरी स्पामधून रोख रक्कम, बिल बूक, कंडोम आणि इतर गोष्टींसह ३८ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुणे शहर पोलिसांनी शनिवारी विमान नगर परिसरात स्पाच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, विमानतळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विमान नगरमधील दत्ता मंदिर चौकाजवळ असलेल्या एका रो-हाऊसमधील ‘सिग्नेचर थाई स्पा’वर दुपारी ४.१५ च्या सुमारास छापा टाकला, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
पोलिसांनी सांगितलं की, छाप्यात त्यांनी स्पा मधून पाच महिलांची सुटका केली. पोलिसांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्ली येथील रहिवासी असलेल्या या महिलांना देहव्यापारात ढकलण्यात आलं होतं आणि त्या गेल्या काही महिन्यांपासून त्या स्पामध्ये काम करत होत्या.
विमानतळ पोलीस ठाण्यात पोलिसांनी आसामचा रहिवासी असलेल्या २८ वर्षीय स्पा चालक मेहबूब खान लष्कर याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 143 (3) (व्यक्तीची तस्करी) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3, 4, 5 आणि 7 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
उपनिरीक्षक राठोड यांनी सांगितलं की, छाप्यात रोख रक्कम, दोन पॉइंट-ऑफ-सेल मशीन, स्पाची बिल पुस्तके, कंडोम आणि इतर वस्तू असा एकूण ३८ हजार ४७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.स्पा चालकाला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, आरोपी स्पा येथे देहविक्री व्यवसायासाठी ग्राहकांशी संपर्क साधण्याकरिता ऑनलाइन किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत होते. पुढील तपास सुरू आहे,” असं विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी सांगितलं आहे.