अंबरनाथच्या राजकारणाता पुन्हा एकदा मोठा भूकंप!

Spread the love

अंबरनाथच्या राजकारणाता पुन्हा एकदा मोठा भूकंप!

शिवसेना शिंदे गटाला जबरदस्त दणका, कोर्टातून सर्वात मोठी बातमी समोर

योगेश पांडे / वार्ताहर

अंबरनाथ – महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे, भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला, महाराष्ट्रातील अनेक महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता आली, मात्र महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होताच आता शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयातून मोठी बातमी समोर येत आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या सभापती निवड व सहा समित्यांची निवड करण्यासाठी सोमवारी भरवण्यात येणारी सभा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तहकूब करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. शिवसेना शिंदे गटानं स्थापन केलेली आघाडी मान्य करण्याच्या ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला अंबरनाथ विकास आघाडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, त्यावर आता न्यायालयानं हा निर्णय दिला असून, यामुळे आता अंबरनाथच्या राजकारणाता पुन्हा एकदा मोठा भूकंप पहायला मिळण्याची शक्यता आहे.

अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने एकत्र येत सत्ता स्थापन केली असली तरी विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीचा मुद्दा पुन्हा एकदा गाजण्याची शक्यता आहे. कारण भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एका अपक्षाने मिळून अंबरनाथ नगरपालिकेत अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली, मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी अजित पवार गटानं शिवसेना शिंदे गटाशी हातमिळवणी केल्यानं या नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाची सत्ता आली. भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं.

दरम्यान त्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने आधी भाजप बरोबर केलेली आघाडी तोडण्यात यावी, यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. भाजपबरोबर आघाडी स्थापन करण्यासाठी दिलेली प्रतिज्ञापत्रे मागे घेऊन, तो निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची विनंती मान्य करत ९ जानेवारी रोजी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युतीला मान्यता दिली होती, त्यामुळे या नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आली.

दरम्यान याविरोधात भाजपच्या नेतृत्वाखालील अंबरनाथ विकास आघाडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी पार पडली, या याचिकेवर निर्णय देताना हायकोर्टाने सोमवारी विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यासाठी बोलावण्यात आलेली सभा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तहकूब करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे आता सर्वांचीच धक्काधूक वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon