राज्याच्या महावितरण विभागात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेत १०० कोटींचा घोटाळा; भावेशकुमार, हितेशभाई, हिरेनकुमार विरोधात गुन्हा दाखल

Spread the love

राज्याच्या महावितरण विभागात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेत १०० कोटींचा घोटाळा; भावेशकुमार, हितेशभाई, हिरेनकुमार विरोधात गुन्हा दाखल

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – राज्याच्या महावितरण विभागात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी २.० योजनेच्या माध्यमातून हा घोटाळा झाल्याचे उघड झालं आहे. २०२४ ते २०२६ दरम्यान ओम एस सीजेआर लामाट व्हिया प्रोजेक्ट कंपनीने महावितरणची १०० कोटींची फसवणूक केली. कंपनीच्या संचालकांवर निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनीचे संचालक भावेशकुमार पटेल, हिरेनकुमार कनानी आणि हितेशभाई राविया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरण तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखकडे वर्ग होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेत १०० कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत महावितरणाचा गंभीर आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारीनुसार, २०२४ ते जानेवारी २०२६ दरम्यान मे. ओम यश सी.जे.आर. लामाट विया प्रोजेक्ट्स प्रा. लि. या कंपनीचे संचालक भावेशकुमार अश्विनभाई पटेल, हितेशभाई आणि हिरेनकुमार लावजीभाई कनानी यांनी संगनमताने ९९ कोटी ५० लाख रुपयांची बनावट बँक गॅरंटी तयार केल्याचा आरोप आहे. आरोपींनी स्टेट बँक ऑफ इंडिया, जुनागड शाखा (गुजरात) यांच्या नावाची बनावट बँक गॅरंटी तयार करून त्यावर एसबीआयचा बनावट ई-मेल वापरल्याचे तपासात समोर आले आहे. ही बनावट बँक गॅरंटी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण), मुंबई येथील नवीकरणीय ऊर्जा विभागाकडे सादर करण्यात आली.

महावितरणच्या नवीकरणीय ऊर्जा विभागातील सहाय्यक महाव्यवस्थापक राहुल पन्हाळे यांनी सादर केलेली बँक गॅरंटी खरी असल्याचे भासवून संबंधित कंपनीला काम मिळवून देण्यास मदत केल्याचा आरोप आहे. बँक गॅरंटी बनावट असल्याची माहिती असूनही ती खरी असल्याचे जाणीवपूर्वक दाखवून वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी हा प्रकार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या बनावट बँक गॅरंटीच्या आधारे मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत प्रकल्पासाठी वीज खरेदी करार (पीपीए) प्राप्त करण्यात आला.परिणामी, महावितरणला संबंधित बँक गॅरंटी इनव्होक करता आली नाही. या प्रकारामुळे महावितरण तसेच शासनाची सुमारे ९९.५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी महावितरणचे कर्मचारी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर निर्मलनगर पोलिस ठाण्यात हितेशभाई राविया, हिरेनकुमार कनानी, राहुल पन्हाळे, भावेशकुमार पटेल यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon