विरोधकांचे मनसुबे नेस्तनाबूत; ठाकरे युतीच्या प्रचार व्यवस्थापनाला अभूतपूर्व उसळी, महाराष्ट्र भगवामय

Spread the love

विरोधकांचे मनसुबे नेस्तनाबूत; ठाकरे युतीच्या प्रचार व्यवस्थापनाला अभूतपूर्व उसळी, महाराष्ट्र भगवामय

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या संयुक्त प्रचार मोहिमेने संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, ठाकरे युतीच्या जोरदार मुसंडीने विरोधकांची रणनीती कोलमडल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात भगवामय झालेले वातावरण पाहता, याचे ठळक पडसाद येणाऱ्या निवडणूक निकालात उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.

अचानक वेग घेतलेल्या ठाकरे युतीच्या प्रचारामुळे विरोधकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली असून, अनेक ठिकाणी त्यांची अक्षरशः धडकी भरल्याचे चित्र आहे. शिवसेना–मनसेचे मराठी उमेदवार घराघरात जाऊन, मराठी अस्मितेचा मुद्दा ठासून मांडत थेट मराठी मतदारांच्या उंबरठ्यावर हक्काने मते मागताना दिसत आहेत. याउलट भारतीय जनता पक्षाच्या अनेक परप्रांतीय उमेदवारांना मराठी भाषेवर प्रभुत्व नसल्याने ते प्रचारादरम्यान त-त-म-म करताना आणि मतदारांसमोर गोंधळून जाताना दिसत आहेत.

दीर्घ काळानंतर मराठी माणूस एकवटलेला आणि त्वेषाने पेटून उठलेला दिसत असून, रस्त्यावर, चौकात, चहाच्या टपऱ्यांवर आणि घराघरात एकच नाव अभिमानाने घेतले जात आहे—‘ठाकरे’. परिस्थिती अशी आहे की दहा पैकी नऊ मतदारांच्या तोंडातून ठाकरे नाव मोठ्या गर्वाने निघत असल्याचे चित्र अनेक भागांत दिसून येत आहे.

विशेष बाब म्हणजे, केवळ मराठी मतदारच नव्हे तर काही ठिकाणी परप्रांतीय मतदारसुद्धा या भगवामय वातावरणामुळे ठाकरे युतीकडे वळताना दिसत आहेत. “मुंबईने आम्हाला खूप काही दिलं आहे. यावेळी आम्ही खोटे आश्वासन देणाऱ्या आणि थापाड्या लोकांना मत देणार नाही,” असे परप्रांतीय मतदार आवर्जून सांगत आहेत. हा बदललेला सूर राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

हे चित्र आता फक्त मुंबईपुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत ठाकरे युतीबाबत मराठी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहानुभूती निर्माण झाली असून, प्रचार सभांना आणि पदयात्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, भ्रष्टाचाराचे आरोप, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना दिलेली उमेदवारी आणि सत्तेचा गैरवापर या मुद्द्यांमुळे सुशिक्षित आणि संतप्त मतदारांमध्ये भारतीय जनता पक्षाबाबत तीव्र नाराजी आहे. हा मतदार आपले अमूल्य मत ठाकरे युतीच्या झोळीत टाकण्याचा निर्धार करत असल्याचे एकंदर वातावरणातून स्पष्ट होत आहे.

एकंदरीत, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ठाकरे युतीने घेतलेली ही आघाडी विरोधकांसाठी डोकेदुखी ठरत असून, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon