डंपर चालकाने दुचाकीस्वरासह एकाला चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू;चालकाला अटक

Spread the love

डंपर चालकाने दुचाकीस्वरासह एकाला चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू;चालकाला अटक

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – पूर्वद्रुतगती मार्गावर एका डंपर चालकाने दुचाकी स्वरासह एकाला चिरडल्याची घटना घडली आहे. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. रामनारायण संताप्रसाद यादव (५१) आणि भीमाशंकर गोपाल यादव (३५) अशी मृतांची नावे आहेत. मृत झालेले दोघे मामा भाचे होते. ते साकीनाक्याचे रहिवासी असून कल्याणला घर पाहण्यास गेले होते. तिकडून परतत असताना विक्रोळी जवळ त्यांचा हा अपघात झाला.

पूर्वद्रुतगती मार्गावर रविवारी धक्कादायक घटना घडली आहे. एका डंपर चालकाने दुचाकीस्वरासह एकाला चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी प्रकरणी डंपर चालक ज्ञानेश्वर विष्णू गायकवाड याला विक्रोळी पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत. दरम्यान, याठिकाणी अपघात नेमका कसा झाला याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon