रेझिंगडे व रस्तासुरक्षा अभियान२०२६ अंतर्गत विठ्ठलवाडी वाहतूक शाखेकडून उसाटणे येथे विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती
पोलीस महानगर नेटवर्क
उसाटणे : रेझिंगडे व रस्तासुरक्षा अभियान २०२६ च्या अनुषंगाने विठ्ठलवाडी वाहतूक शाखेच्या वतीने शिवाजी नामदेव भंडारी ज्युनिअर कॉलेज, उसाटणे येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, सीट बेल्टचे महत्त्व तसेच अल्पवयीन वाहनचालकांवरील कायदेशीर कारवाई याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे अपघातांचे दुष्परिणाम समजावून सांगत सुरक्षित व जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही वाहतूक नियमांचे पालन करण्याची शपथ घेत कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक जाणीव निर्माण झाली आहे.