शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदेंकडून मोठा धक्का; नरेश म्हस्केंची फिल्डिंग फेल, मुलाचं तिकीट कापलं

Spread the love

शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदेंकडून मोठा धक्का; नरेश म्हस्केंची फिल्डिंग फेल, मुलाचं तिकीट कापलं

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – महानगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच पक्षाकडून युतीची घोषणा जाहीर करण्यापासून स्वबळावर निवडणूक लढण्यापर्यंत मोठ्या हालचाली कराव्या लागल्या. अशात शेवटच्या दिवशी अनेकांना लॉटरी लागली तर काहींना मोठा झटका बसला आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांना जोरदार झटका दिला आहे.

ठाणे महानगर पालिकेतून नरेश म्हस्के यांचा मुलगा आशुतोष म्हस्के इच्छुक होता. म्हस्के पिता पुत्रांनी यासाठी तयारी देखील केली होती. नरेश म्हस्के हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या मुलाला आरामात तिकीट मिळेल, अशी चर्चा होती. मात्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांना जोरदार धक्का देत नरेश म्हस्केंच्या मुलाचं तिकीट कापलं.

⁠मुलगा आशुतोष म्हस्के याला तिकिट मिळावं, यासाठी नरेश म्हस्केंनी स्वत: फिल्डिंग लावली होती. ⁠मात्र म्हस्केंचे डाव अपयशी ठरला.ठाण्यात इतरही अनेक दिग्गज नगरसेवकांचं तिकीट कापण्यात आलं. यामुळे शिंदे गटात मोठा संताप उमटला आहे. अशात ⁠⁠बंडोबांना थंड करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: ठाण्यात पोहोचले.

ठाण्यातील ⁠आनंदमठ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झालेल्या उमेदवारांची समजूत घातली.अनेक नाराज दिग्गज नगरसेवकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनधरणी केली आहे. युती झाल्याने ठाण्यातून अनेक दिग्गजांची उमेदवारी कापल्याचं ते उमेदवारांना सांगितले,मात्र यामुळे अनेक दिग्गज शिवसेना नगरसेवक नाराज झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon