बदलापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मोटरसायकल चोरीतील दोन आरोपी ताब्यात, ४ मोटारसायकली हस्तगत
पोलीस महानगर नेटवर्क
बदलापूर : बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटरसायकल चोरी प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुख्य आरोपी व विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींकडून बदलापूर पश्चिम, बदलापूर पूर्व तसेच मानपाडा–डोंबिवली परिसरातून चोरीस गेलेल्या ३ रॉयल एनफील्ड (बुलेट) व एक पल्सर अशी एकूण चार मोटरसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
पोलीसांकडून सातत्याने तपास सुरू असून या कारवाईमुळे परिसरातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.