तांत्रिक तपासाची दमदार कामगिरी! कोपरी पोलिसांनी गहाळ मोबाईल शोधून मालकांना परत केले
ठाणे : कोपरी पोलीस ठाणे हद्दीत प्रॉपर्टी मिसिंग अंतर्गत नोंद झालेल्या तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करत २ सॅमसंग व १ विवो मोबाईल शोधण्यात यश मिळाले.
या प्रकरणात पोलीस ठाण्याचे मपोशी कदम यांनी तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून मोबाईल लोकेशन शोधून काढत संबंधित फोन जप्त केले. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीसांनी सदर मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात सुपूर्द केले.
या कार्यवाहीमुळे गहाळ मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी सुखद समाधान व्यक्त केले असून पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.