बोगस आयएएस अधिकाऱ्याचा तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास नडला
योगेश पांडे / वार्ताहर
तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, देशभरातून भाविक गर्दी करत असतात.नववर्षाच्या निमित्ताने आता भाविकांची गर्दी वाढत असून विविध राज्यातून देवदर्शनासाठी, सहकुटुंब सहपरिवार भाविक येत आहेत. त्यामुळे, येथील प्रशासनावरही ताण वाढला आहे.
तुळजाभवानी मंदिरात आय.ए.एस.अधिकारी असल्याचे सांगून व्हीआयपी दर्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका बोगस आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश झाल्याचं पाहायला मिळालं.लोकसेवा आयोगाचे बनावट ओळखपत्र दाखवून कुटुंबीयासह व्हीआयपी दर्शनासाठी निखील परमेश्वरी याने प्रयत्न केला. मात्र, त्याचा बनाव उघडा पडल्यानंतर त्याची कुटुंबीयासह पंचायत झाली.व्हीआयपी दर्शनासाठी तोतयागिरी करणाऱ्याचं मंदिर संस्थांनच्या कर्मचाऱ्यांकडून निखिल मदनलाल परमेश्वरी या तोतयाचं पितळ उघड करण्यात आलं.
बोगस आयडेंटीटी कार्ड दाखवत मंदिरात प्रवेश मिळवणाऱ्या या तोतयाला मंदिर संस्थांनच्या कर्मचाऱ्यांनी तुळजापूर पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.दरम्यान, तुळजापूर पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू असून तो मूळ उत्तर प्रदेशातील असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे.