खोटे जात प्रमाणपत्र बनवून अनुसूचित जातीचा लाभ घेणाऱ्यांवर एट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी.
रवि निषाद/मुंबई
भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनी परिसरात राजस्थानी रेगर,मोची,उत्तर भारतीय,गुजराती मेघवार समाज व मराठी बांधव मोठ्या संख्येने निर्वासित म्हणून राहावयास आला.रेगर आणि मोची समाज यांचा प्रामुख्याने चप्पल बनविणे हा व्यवसाय राहिला आहे.महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातींचा एक समूह असून त्यात चर्मकार,मोची,मेघवार,महार(बौद्ध)या जातींसह एकूण 59 जाती येत आहेत.मात्र राजस्थान मध्ये अनुसूचित जातीत असलेला रेगर समाज हा महाराष्ट्रात खुल्या प्रवर्गात येत आहे.चप्पल व्यवसाय करणारा रेगर समाज बांधव शैक्षणिक,व्यावसायिक व राजकीय आरक्षणाचा लाभ मिळवून घेण्याकरिता हिंदू-मोची जातीचे प्रमाणपत्र बनवून घेत असल्याची गंभीर बाब समोर येत असून अनुसूचित जातीमधून आरक्षण घेणाऱ्या मूळ जातींवर एक प्रकारे गंडांतर येणार आहे.व मूळ आरक्षण धारक बांधव अशा खोट्या दिशाभूल करणाऱ्या हिंदू-मोची जातीच्या प्रमाणपत्र मुळे वंचित राहणार आहे.महाराष्ट्र राज्यात रेगर समाजाचा अनुसूचित जातींत समावेश व्हावा म्हणून अनेकांनी मागणी केलेली आहे मात्रं सरकार दरबारी आजही प्रलंबित आहे.हिंदू-रेगर जात लपवून लाभासाठी हिंदू-मोची जातीचे खोटे प्रमाणपत्र मिळवून घेणाऱ्यांवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी समाजसेवक व अभ्याशक श्री. कुशल निर्वाण यांनी केली आहे..