ठाणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई : दोन आरोपी ताब्यात, अग्नीशस्त्रे व चोरीची मोटरसायकल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठाणे पोलिसांनी सतर्कतेने कारवाई करत दोन इसमांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान आरोपींकडून २ अग्नीशस्त्रे, ७ जिवंत काडतूस तसेच चोरीची एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.
जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ₹१,५२,६००/- इतकी असून, सदर कारवाईमुळे संभाव्य गुन्हेगारी कृत्यांना आळा बसला आहे. आरोपींविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठाणे पोलीस सदैव सज्ज असून, शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.